पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने रेल्वेच्या पार्सल विभागातून लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.रेल्वेच्या दक्षता पथकाने जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस च्या पार्सल बोगीतून आलेले ९३ किलो लाल चंदन जप्त केले आहे. या प्रकरणी एका तस्कराला अटक केली आहे.
हारून अब्दुल लतीफ मांडवीवाला असे या तस्कराचे नाव आहे.लाल चंदनाची तस्करी करणारे मोठे सिंडिकेट असल्याचा संशय रेल्वेच्या दक्षता पथकाने व्यक्त केला आहे. दक्षता पथकाने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेतुन होणारी बेकायदेशीर वाहतूक तसेच तस्करी रोखण्यासाठी दक्षता पथक गठीत करण्यात आलेले आहे. हे दक्षता पथक रेल्वेच्या पार्सल बोगीतून होणारी बेकायदेशीर वाहतूक तसेच अवैध वस्तूची तस्करीवर आळा घालून तस्करावर कारवाई करते.
पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने १९ जानेवारी रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक या येथे आलेल्या प्रत्येक एक्सप्रेसच्या बोगीमध्ये तपासणी केली, या तपासणी दरम्यान जयपूर – मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसच्या भाडेतत्त्वावरील पार्सल बोगी मध्ये तब्बल १२ तासांहून अधिक काळ केलेल्या तपासणीत दक्षता पथकाच्या हाती ९२.९ किलो वजनाच्या १५ लाकडांच्या लाल चंदनाचे चार संशयास्पद पॅकेजेस आढळून आले. जप्त केलेला लाल चंदन कायदेशीर पार्सल बुकिंगच्या नावाखाली तस्करी करण्यात आले होते. या प्रकरणी हारून अब्दुल लतीफ मांडवीवाला या तस्कराला अटक करण्यात आली असून जप्त करण्यात आलेले लाल चंदन आणि आरोपीला पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती दक्षता पथकाने दिली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community