महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना घवघवीत यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. या योजनेअंतर्गत घोषित केलेला वाढीव रकमेचा हफ्ता नेमका खात्यात कधी जमा होणार हाच प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात होता. ज्यासंदर्भात आता सरकारमधी जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री (Water Resources Minister and Guardian Minister of Ahilyanagar) राधाकृष्ण विखे पाटील स्पष्ट वक्तव्य केलं आहे. (Radhakrishna Vikhe-Patil)
मार्च महिन्यातील राज्याच्या अर्थसंकल्पानंतर (Budget 2025) लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार आहे, अशी माहिती देत महायुती सरकार (Mahayuti Govt) लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही, असं वक्तव्य राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील केलं आहे. शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विखे पाटलांनी ही बाब उपस्थितांसमोर ठेवली. जिथं त्यांनी लाडक्या बहिणींचा हफ्ता 1500 हुन 2100 रुपये होणार असल्याची हमी दिली. दरम्यान ही योजना बंद करण्याची कोणतीही चर्चा नसल्याचंही त्यांनी यावेळी लक्षात आणून दिलं.
(हेही वाचा – पूर रोखण्यासाठी नद्यांमधील गाळ काढण्याला प्राधान्य द्या; Nitesh Rane यांचे निर्देश)
लाडक्या बहिणींना जानेवारीची रक्कम लवकरच
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukyamantri ladaki Bahin Yojana) योजनेचा जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीपूर्वीपासून मिळण्यास सुरु होईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी दिली होती. राज्य सरकारनं जानेवारी महिन्याच्या लाभाच्या वितरणासाठी 3690 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे दिले आहेत. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 47 लाख लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम मिळाली होती.
(हेही वाचा – Smuggling : लाल चंदनाच्या तस्करीसाठी रेल्वेचा वापर, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ९३ किलो लाल चंदन जप्त)
लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9000 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं जुलै 2024 पासून सुरु केली आहे. या योजनेचे पहिले दोन हप्ते एकत्रितपणे ऑगस्ट महिन्यात देण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर पर्यंत एकूण 6 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आली. म्हणजेच 1500 रुपयांप्रमाणं महिलांना एकूण 9000 हजार रुपये मिळाले आहेत. महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली होती.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community