डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी, २० जानेवारी या दिवशी कॅपिटल हिलवर अमेरिकन संसदेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष (US president) म्हणून शपथ घेतली. या वेळी त्यांनी पहिल्याच भाषणात १० मोठ्या घोषणा केल्या. सत्तेवर येताच ट्रम्प यांनी देश-विदेशात अमेरिकन धोरणांमध्ये अनेक मोठे बदल घडवून आणण्याची चर्चा केली. शपथविधीनंतर ३० मिनिटांच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिका फर्स्ट पॉलिसी अंतर्गत इतर देशांवर टॅरिफ लादण्याबाबत बोलले. त्याच वेळी त्यांनी अमेरिकेत फक्त स्त्री-पुरुष लिंग (transgenders) ओळखण्याची घोषणा केली.
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांची क्लॉस श्वाब यांच्याशी भेट, दावोस येथे महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज)
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आजपासून अमेरिकन सरकारसाठी पुरुष आणि महिला असे दोनच लिंग असतील. सर्व सरकारी सेन्सॉरशिप तात्काळ संपुष्टात आणण्यासाठी आणि अमेरिकेतील भाषण स्वातंत्र्य पुनर्संचयित करण्यासाठी मी कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी करेन.
यापूर्वी ट्रम्प यांचे संरक्षणमंत्री पिट हेगसेथ यांनीही म्हटले होते की, सैन्यात महिला आणि ट्रान्सजेंडरचा समावेश केल्याने अमेरिकेची सुरक्षाव्यवस्था कमकुवत होत आहे.
या वेळी ट्रम्प यांनी स्थलांतरितांच्या मुद्द्यावरही गांभीर्याने काम करण्याविषयी भाष्य केले. ट्रम्प म्हणाले, बिडेन प्रशासनाने बेकायदेशीरपणे आपल्या देशात घुसलेल्या धोकादायक गुन्हेगारांना आश्रय दिला आहे आणि संरक्षण दिले आहे. यापुढे सरकार अमेरिका-मेक्सिको सीमेवर (दक्षिण सीमा) आणीबाणी लागू करणार आहे. येथून सर्व बेकायदेशीर प्रवेशांवर बंदी घालण्यात येणार आहे. गुन्हे करणाऱ्या परदेशी लोकांना सरकार त्यांच्या देशात परत पाठवेल.
ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात केलेल्या काही मोठ्या घोषणा
१. आज चीन पनामा कालवा चालवत आहे. ते आम्ही चीनला दिलेले नाही. आम्ही ते पनामा देशाला दिले. आम्ही ते परत घेणार आहोत.
२. मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून गल्फ ऑफ अमेरिका ठेवणार.
३. आम्ही आमच्या देशातील लोकांना श्रीमंत करण्यासाठी इतर देशांवर शुल्क आणि कर लादणार आहोत.
४. सरकार ग्रीन न्यू डील समाप्त करेल. ग्रीन न्यू डील स्वच्छ ऊर्जेला चालना देते.
५. आपल्या देशात अशी शिक्षण व्यवस्था आहे जी, आपल्या मुलांना स्वतःची लाज बाळगायला शिकवते. पण आजपासून हे सर्व बदलणार आहे. ते खूप वेगाने बदलणार आहे.
६. मंगळावर अमेरिकन ताऱ्यांचा ध्वज लावण्यासाठी ते अंतराळवीर पाठवणार
७. अमेरिकेतील परदेशी टोळ्यांना लक्ष्य करण्यासाठी 1798च्या एलियन एनिमीज अॅक्टचा वापर करणार. गुन्हेगारी टोळ्यांना परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community