Mhada Lottery ची सोडत लांबणीवर

192

मुंबईत स्वतः चे घर घ्यायची अनेकांची इच्छा असते. मुंबईत घर घेणे हे मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे म्हाडा परवडणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध करुन देते. यासाठी लॉटरी काढली जाते. दरम्यान, म्हाडाच्या घरांसाठी (Mhada Home) अर्ज केलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या २२६४ घरांसाठीची लॉटरी (Mhada Lottery) फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे. यापूर्वी ३१ जानेवारीला ही लॉटरी लागणार होती. मात्र, आता ही सोडत फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे. (Mhada Lottery)

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Area Development Authority) द्वारे आयोजित कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या 2264 घरांसाठी लॉटरी आयोजित करण्यासाठी 31 जानेवारी 2025 ही तारीख निश्चित करण्यात आली होती, परंतु आता ती वाढवण्यात आली आहे. म्हाडाने घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता लॉटरी कधी लागणार याबाबत माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi ‘या’ दिवशी महाकुंभमेळ्यामध्ये येऊन अमृतस्नान करणार)

म्हाडा कोकण मंडळानं (Mhada Konkan Division) २२६४ घरांच्या विक्रीसाठी अर्ज मागवले होते. यामध्ये ५९४ सदनिका, १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेत ८२५ फ्लॅट (Mhada Flat), कोकण मंडळाच्या ७२८ फ्लॅट विक्रीसाठी आहेत. कोकण मंडळाच्या २२६४ घरांची लॉटरी ३१ जानेवारीला लागणार होती. मात्र, ही लॉटरी लांबणीवर गेली आहे. म्हाडाच्या घरांचा निकाल मोबाईलवर एसएमएस आणि ई-मेलद्वारे येईल. दरवर्षी म्हाडा काही घरे विक्रीसाठी उपलब्ध करत असते. यावर्षीही त्यांनी १२०० घरांसाठी सोडत (Mhada) काढली आहे. आता फेब्रुवारी महिन्यात ही सोडत निघणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.