पोलिसांसोबतच्या चकमकीनंतर दोन Cattle smuggler ला अटक; ३२ गाई आणि बेकायदेशीर शस्त्रे जप्त

148
पोलिसांसोबतच्या चकमकीनंतर दोन Cattle smuggler ला अटक; ३२ गाई आणि बेकायदेशीर शस्त्रे जप्त
पोलिसांसोबतच्या चकमकीनंतर दोन Cattle smuggler ला अटक; ३२ गाई आणि बेकायदेशीर शस्त्रे जप्त

मीरजापुर येथील अदलहाट पोलिस स्टेशन परिसरात पोलिस, एसओजीच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत दोन गो तस्करांना चकमकीनंतर अटक करण्यात आली आहे. ही घटना राणीबाग (Ranibaug) गावाजवळ घडली, जिथे तस्करांच्या (Cattle smuggler) गाडीला आणि ट्रकला वेढा घालताना पोलिसांसह तस्करांची चकमक झाली.

( हेही वाचा : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारीत निघणार Mhada Lottery

पोलिस पथकाने संशयावरून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तस्करांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार करत आरोपींना जेरबंद घातले. यावेळी तस्करांच्या पायात गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर त्यांना पकडण्यात आले. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे ती अब्बू सहामा (३३), प्रयागराज (Prayagraj) येथील रहिवासी आणि मेहबूब आलम (२७), कौशांबी येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी तस्करांविरुद्ध गोवंश हत्या कायदा, प्राणी क्रूरता कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही तस्करांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. ही चकमक आणि अटकेची कारवाई प्रभारी निरीक्षक अमित मिश्रा (Amit Mishra) आणि एसओजी प्रभारी राजीव कुमार सिंह (Rajeev Kumar Singh) यांच्या पथकाने केली. परिसरातील गाईंची तस्करी रोखण्याच्या दिशेने पोलिसांची ही मोठी कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. अटक करण्यात आलेला आरोपी अब्बू सहामा याआधीही अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. २०१९ मध्ये प्रयागराजमधील धूमनगंज पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.