तटकरे कुटुंबियांवरील टीका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही – Anand Paranjape

156
तटकरे कुटुंबियांवरील टीका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही - Anand Paranjape
तटकरे कुटुंबियांवरील टीका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही - Anand Paranjape

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर झालेल्या वैयक्तिक टिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “तटकरे कुटुंबीयांबद्दल वापरण्यात आलेली भाषा अशोभनीय, निंदनीय आणि महायुतीच्या धर्माला गालबोट लावणारी आहे. अशा प्रकारची टिका कदापि सहन केली जाणार नाही,” असा इशारा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिला. (Anand Paranjape)

रायगड पालकमंत्रीपदावरून वाद

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अदितीताई तटकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी विरोध दर्शवत टिका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना परांजपे म्हणाले, “महायुतीतील घटकपक्षांनी असंतोष असल्यास तो पक्षप्रमुखांकडे मांडला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी अशा टिकेने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतो.” (Anand Paranjape)

(हेही वाचा- पोलिसांसोबतच्या चकमकीनंतर दोन Cattle smuggler ला अटक; ३२ गाई आणि बेकायदेशीर शस्त्रे जप्त)

भरत गोगावले यांच्यावर टीका

परांजपे यांनी शिवसेना नेते व मंत्री भरत गोगावले यांच्या आंदोलन शैलीवरही आक्षेप घेतला. “संविधानिक पदावर असून टायर जाळणे आणि रास्ता रोको करणे हे कायदा व सुव्यवस्थेला धक्का देणारे कृत्य आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे, त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये,” असा सल्ला त्यांनी दिला. (Anand Paranjape)

अदितीताई तटकरे यांचे कर्तृत्व

“अदितीताई तटकरे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून मंत्रीपदापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी त्या फिल्डवर उतरून लोकांची मदत करतात. ‘माझी लाडकी बहिण’ योजनेतून २ कोटी ३५ लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ पोहोचवला. अशा कर्तृत्ववान महिलांवर अशोभनीय टिका खपवून घेतली जाणार नाही,” असे परांजपे म्हणाले. (Anand Paranjape)

(हेही वाचा- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारीत निघणार Mhada Lottery)

महायुतीतील असंतोषाची शांतता गरजेची

रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांबाबत नाराजी व्यक्त झाली आहे. “मुख्यमंत्री दावोसहून परतल्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यावर तोडगा काढतील,” असे परांजपे यांनी सांगितले. (Anand Paranjape)

या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.  (Anand Paranjape)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.