UBT च्या संभाजीनगरमधील ३५ स्थानिक नेत्यांनी दिले सामूहिक राजीनामे

84

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्यानंतर मविआतील उबाठा (UBT)  शिवसेनेमध्ये अक्षरशः गळती लागली आहे. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मंगळवार, २१ जानेवारीला ठाकरे गटाचे संभाजीनगर शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह तब्बल ३५ स्थानिक नेत्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले. यामध्ये माजी नगरसेवक आणि शिवसेना आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

(हेही वाचा Violence Against Women : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काय आहेत उपाययोजना?)

विश्वनाथ स्वामी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राजीनामा सादर केला आहे. हे सर्व पदाधिकारी मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक स्थानिक नेते शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मराठवाड्यात पक्षात मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजीनगचे माजी महापौर नंदकुमार घोडले यांनी शिवसेना शिंदे सेनेत प्रवेश केला. नुकताच पक्षाचे मराठवाडा विभाग सचिव अशोक पटवर्धन यांनीही शिवसेना शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. (UBT)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.