पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दि. ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्याला जाणार आहेत. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दि. २७ जानेवारी रोजी तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) दि. १ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्याला भेट देणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) ही दि. १० फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्याला हजेरी लावणार आहेत.
( हेही वाचा : Western Express Highway : श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग रस्ता रुंदीकरणाचे काम मार्चपासून सुरू होणार)
महाकुंभ मेळ्याला दि. १३ जानेवारी रोजी सुरुवात झाली असून आतापर्यंत सुमारे ९ कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. तरी येत्या २६ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या महाकुंभात एकूण ६ स्नान होणार आहेत, त्यापैकी ३ अमृत स्नान आहेत. तीन अमृत स्नानांपैकी एक आधीच झाले आहे, ज्यामध्ये सुमारे साडेतीन कोटी लोकांनी भाग घेतला होता. यात १३ वेगवेगळ्या आखाड्यांमधील संत आणि साधू देखील होते. महाकुंभात दररोज सुमारे १० लाख भाविक गंगा नदीत स्नान करतात. आतापर्यंत ८.२६ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community