Uddhav Thackeray यांचे Sharad Pawar चरणी लोटांगण!

212
Uddhav Thackeray यांचे Sharad Pawar चरणी लोटांगण!
Uddhav Thackeray यांचे Sharad Pawar चरणी लोटांगण!
  • खास प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी स्व: बळाचा नारा देणाऱ्या शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस (शप) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चरणी त्यांच्या घरी जाऊन सपशेल लोटांगण घातले.

सर्व ‘अर्था’ने प्रतिष्ठेची बाब

शिवसेना उबाठाचा जीव मुंबई महापालिकेमध्ये असल्याचे बोलले जाते. गेली तीन दशके मुंबई महापालिकेत सत्ता असल्याने देशात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या महापालिकेवर वर्चस्व ही उबाठासाठी सर्व ‘अर्था’ने प्रतिष्ठेची बाब मानली जाते. त्यामुळे राज्यात सत्ता नाही मिळाली तरी मुंबई महापालिकेत सत्तेवर राहावे, असा प्रयत्न शिवसेना उबाठाकहा कायम असतो.

(हेही वाचा – Western Express Highway : श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग रस्ता रुंदीकरणाचे काम मार्चपासून सुरू होणार)

ठाकरेंनी मनसे पक्ष फोडला

राज्यात युतीत सत्तेवर असताना शिवसेना आणि भाजपा गेल्या (२०१७) मुंबई महापालिका निवडणुकीत युतीत न लढता वेगळे लढले आणि २२७ जागांपैकी शिवसेना ८४ तर भाजपाचे ८२ नगरेवक निवडून आले. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी प्रयत्न केले असते तर मुंबईत भाजपाचा पहिला महापौर बसला असता. मात्र फडणवीस यांनी मवाळ आणि सामंजस्याची भूमिका घेतली आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनसे फोडून आपले वर्चस्व कायम ठेवले.

काहीही करा, आघाडीत लढा!

पुढील ३-४ महिन्यात मुंबईसह राज्यातील सर्वच २९ महानगरपालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. शिवसेना उबाठाला मात्र मुंबईची सर्वाधिक काळजी असून कोणत्याही परिस्थितीत मुंबईवरील सत्ता जाता कामा नये यासाठी उबाठाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आणि मुंबई महापालिका निवडणुकीत काहीही करा आणि काँग्रेससोबत आघाडीत महापालिका निवडणूक लढा, अशी गळ घातल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा – अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा; C. P. Radhakrishnan यांचे आवाहन)

मध्यस्थी करण्यासाठी मनधरणी

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईत अस्तित्व नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर आपापसात चिखलफेक केल्यानंतर राज्यातील कॉँग्रेस नेत्यांशी जुळवून घेण्यात कमीपणा वाटत असल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची मध्यस्थी करण्यासाठी मनधरणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग सोमवारी २० जानेवारी २०२५ च्या भेटीत झाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.