उत्पन्न वाढीसाठी अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण निर्णय घेणार; उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची माहिती

57
उत्पन्न वाढीसाठी अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण निर्णय घेणार; उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची माहिती
उत्पन्न वाढीसाठी अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण निर्णय घेणार; उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची माहिती

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह विविध योजना सरकारने जाहीर केल्या होत्या. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर एक लाख कोटीपेक्षा अधिकचा भार आला. त्यामुळे महसूलात येणारी तूट भरून काढून राज्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी येथे दिली.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण आज अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना पवार यांनी राज्याचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प (Budget) अधिक कठोर आणि महसूल वाढीवर भर देणारा असल्याचे सूतोवाच केले. गेल्यावर्षी अर्थसंकल्प सादर करताना निवडणुकीचे वर्ष होते, त्यामुळे थोडासा हात ढिला सोडलेला होता. आता मात्र पाच वर्ष आर्थिक शिस्त पाळायची आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचेही यासाठी मनापासून सहकार्य राहिल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – Dental College : शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालय)

येत्या अर्थसंकल्पात (Budget) राज्याच्या पुढील पाच वर्षांच्या वाटचालीचा पाया रचायचा आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील. राज्याचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणाऱ्या विभागांना त्यादृष्टीने सूचना दिल्या आहेत. आपण स्वत: रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बसून विविध विभागांचा आढावा घेत आहोत. राज्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल यादृष्टीने नियोजन सुरू आहे. त्याचे आगामी अर्थसंकल्पात निश्चित प्रतिबिंब दिसेल, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, विकासकामे आणि वित्तीय शिस्त यांचा समतोल साधत सरकार आगामी अर्थसंकल्पात राज्याच्या प्रगतीसाठी ठोस निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ पत्रकारांना २० हजार सन्माननिधी

दरम्यान, राज्य सरकारने सेवानिवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा २० हजार रुपये सन्माननिधी देण्याचे जाहीर केले होते, मात्र त्यांची अंमलबजावणी होत नव्हती. ही बाब अजित पवार यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी येत्या १ एप्रिलपासून ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा २० हजार रुपये सन्मान निधी देण्यार असल्याचे जाहीर केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.