Shiv Sena UBT ची पळापळ!

134
Shiv Sena UBT ची पळापळ!
Shiv Sena UBT ची पळापळ!
  • खास प्रतिनिधी

शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही उबाठाला जशाच तसे उत्तर दिले आणि स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली. काँग्रेसच्या स्वतंत्र भूमिकेमुळे उबाठाची आता पळापळ सुरू झाली असून ‘बळे बळे स्वबळ’ उबाठाच्या अंगाशी आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

(हेही वाचा – उत्पन्न वाढीसाठी अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण निर्णय घेणार; उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची माहिती)

काँग्रेसकडूनही त्याच भाषेत प्रत्युत्तर

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने एकमेकांवर खापर फोडत दूषणे द्यायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील विधानसभानिहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केली. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस आघाडीसोबत न जाता महापालिका स्वतंत्र लढवावी, असे मत व्यक्त केले. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आणि त्याला काँग्रेसकडूनही त्याच भाषेत उत्तर आले.

उबाठाला उपरती

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनीही स्वबळाची भाषा सुरू केली. मुंबईमध्ये महायुतीतील तीन पक्ष भाजपा-शिवसेना (शिंदे)-राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार) एकत्र निवडणूक लढत असल्यास काँग्रेस आणि शिवसेना उबाठाची मते विभागली जातील आणि त्याचा फायदा महायुतीला होणार, ही गोष्ट लक्षात आल्याने आता शिवसेना उबाठाला उपरती झाली आहे. काँग्रेसशिवाय महापालिका निवडणूक लढणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे, असे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाटू लागल्याने त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे आघाडीसाठी मदत याचना केली आहे. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.