Saif Ali Khan हल्ला प्रकरण; आरोपीला घेऊन तपास पथकाने केले घटनेचे Recreation

70
Saif Ali Khan हल्ला प्रकरण; आरोपीला घेऊन तपास पथकाने केले घटनेचे Recreation
Saif Ali Khan हल्ला प्रकरण; आरोपीला घेऊन तपास पथकाने केले घटनेचे Recreation

बॉलिवूड अभिनेता सैफअली खान (Saif Ali Khan) झालेल्या चाकू हल्ल्याचे ‘रिक्रिएशन’ करण्यात आले आहे. तपास पथक सोमवारी २० जानेवारी रोजी पहाटे आरोपीला घेऊन सदगुरु शरण इमारतीत दाखल झाले होते, त्यानंतर सैफ अली खान (Saif Ali Khan) राहत असलेल्या अपार्टमेंट आरोपीने कसा प्रकारे प्रवेश केला याचे रिक्रिएशन करण्यात आले आहे.

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या चाकू हल्ल्यातील अटक आरोपीला मुंबई पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी (रिक्रिएशन) तपासाचा भाग म्हणून गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन गेले होते. मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद या आरोपींसह तपास अधिका-यांनी आरोपीला प्रथम सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) वांद्रे येथील निवासस्थानी नेण्यात आले, जिथे हा हल्ला झाला. त्यानंतर पोलिसांचे पथक नॅशनल कॉलेज बस स्टॉपवर गेले होते, त्यानंतर तपास पथक रेल्वे स्थानकावरून आरोपीला पोलिस जीपमधून वांद्रे पोलिस ठाण्याला परतले.

(हेही वाचा – Republic Day परेडमध्ये प्रथमच दिसणार ‘प्रलय’ मिसाईल)

हल्लेखोर आरोपीने १६ जानेवारी रोजी मध्यरात्री रोजी सैफ अली खानच्या आपार्टमेंट मध्ये चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला होता, त्याने सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि स्टाफ नर्स वर चाकूने हल्ला करून पळ काढला होता. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३११, ३१२, ३३१(४), ३३१(६), आणि ३३१(७) अन्वये गुन्हा दाखल करण्यात केला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे ३० पथके कामाला लागली होती, अखेर ३ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी पहाटे आरोपीला ठाण्यातील कासारवडवली येथुन अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा बांगलादेशातील झलोकाटी जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याची माहिती समोर आले. सोमवारी तपास पथकाने आरोपीला सोबत घेऊन करण्यात आलेले रिक्रिएशन हा तपासाचा एक भाग होता, तसेच या रिक्रिएशन दरम्यान आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.