अमेरिकेचे (America) ४७ वे राष्ट्रध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दि. २० जानेवारी शपथ घेतली. ट्रम्प यांना अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष होण्याची त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळली आहे. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच अनेक कार्यकारी आदेशांवर सह्या केल्या आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटेनच्या (WHO) सदस्यत्वातून अमेरिकेने माघार घेण्याच्या आदेशाचाही समावेश आहे.
( हेही वाचा : Republic Day परेडमध्ये प्रथमच दिसणार ‘प्रलय’ मिसाईल)
शपथ घेतल्यानंतर ट्रम्प ओव्हल ऑफिसमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी अनेक कार्यकारी आदेशांवर सह्या केल्या. त्यांनी माजी राष्ट्रध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या सरकारने घेतलेले ७८ मोठे निर्णय रद्द केले आहेत. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटेनच्या (WHO) सदस्यत्वातून माघार घेण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यासोबतच पॅरिस (Paris) हवामान करारातून अमेरिकेने (America) माघार घेतल्याची घोषणा त्यांनी केली.
ट्रम्प म्हणाले की, आम्ही कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करणार आहोत. मी मागील सरकारने घेतलेले विनाशकारी निर्णय रद्द करेन. मागील सरकार हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट सरकार होते असे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) म्हणाले.डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर काढण्याची ही दुसरी वेळ आहे. कोविड काळात ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर टीका केली होती, तसेच पॅरिस संघटनेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु केली होती, पण सत्तेत येताच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांचा निर्णय रद्द केला होता.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community