ट्रम्प सत्तेत येताच अमेरिकेतील भारतीय वंशाचे नेते Vivek Ramaswamy यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण…

108
ट्रम्प सत्तेत येताच अमेरिकेतील भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण...
ट्रम्प सत्तेत येताच अमेरिकेतील भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण...

भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योगपती आणि राजकारणी विवेक रामास्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ (डओजीई) या विभागाचा राजीनामा दिला आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच सरकारकडून ही माहिती देण्यात आली. राज्यपालपदासाठी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

(हेही वाचा – Saif Ali Khan वर हल्ला करणाऱ्या आरोपीला जायचे होते अरब देशात म्हणून ….)

या संदर्भात रामास्वामी (Vivek Ramaswamy) यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, ‘डीओजीई’ची निर्मिती करण्यास साहाय्य करणे हा एक सन्मान होता.

मला निश्‍चिती आहे की, इलॉन मस्क (Elon Musk) आणि त्यांचे पथक सरकार सुव्यवस्थित करण्यात यशस्वी होईल. ओहायोमधील माझ्या भविष्यातील योजनांबद्दल मला लवकरच अधिक सांगायचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकेला पुन्हा उच्च स्थानावर नेण्यास सिद्ध आहोत.

या निर्णयामागे विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) यांना ओहायो राज्याच्या राज्यपालपदाची (ohio state governor) निवडणूक लढवायची आहे, असे कारण सांगितले जाते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.