CM Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींचे सामंजस्य करार !

56
CM Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींचे सामंजस्य करार !
CM Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींचे सामंजस्य करार !

दावोसमध्ये (Davos MoU) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे (World Economic Forum) मंगळवारी (21 जाने.) उदघाटन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे ९२ हजार २३५ इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. यातील एकच करार ३ लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू (JSW) यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-WHO मधून अमेरिका होणार बाहेर; सत्तेत येताच ट्रम्प यांचा मोठा निर्णय

महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत याबद्दल जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल (Sajjan Jindal) यांचे आभार मानले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-महाकुंभमेळ्यात स्फोटाची जबाबदारी Khalistani Terrorist ने स्वीकारली 

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडतो आहे. पण, येथे आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे, असे सांगताना ते म्हणाले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी प्रक्रिया आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितले, असे सज्जन जिंदाल यांनी यावेळी सांगितले. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-राहुल गांधी हे ‘पप्पू टप्पू उडान टप्पू’; खासदार Dr. Anil Bonde यांची टीका

दावोसमध्ये पहिला करार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा असलेल्या गडचिरोलीसाठी झाला. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. यात गुंतवणूक ५ हजार २०० कोटी रुपयांची असून ४ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. आज झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत. (CM Devendra Fadnavis)

फ्युएलची पुण्यात संस्था
यातील एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला असून, ते महाराष्ट्रातील ५ हजार युवकांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.