न्या. Alok Aradhe यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली

49
न्या. Alok Aradhe यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली
न्या. Alok Aradhe यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली

तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. हा शपथविधी समारंभ मुंबईतील राजभवन येथे संपन्न झाला. (Alok Aradhe)

(हेही वाचा- राहुल गांधी हे ‘पप्पू टप्पू उडान टप्पू’; खासदार Dr. Anil Bonde यांची टीका)

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना पदाची शपथ दिली. या प्रसंगी राज्यपालांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई उच्च न्यायालयातील अनेक मान्यवर न्यायाधीश उपस्थित होते. (Alok Aradhe)

शपथविधी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली. शपथविधीपूर्वी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केंद्र सरकारने जारी केलेली नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधीनंतर राज्यपाल आणि उपमुख्यमंत्र्यांनी न्या. आराधे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. (Alok Aradhe)

(हेही वाचा- WHO मधून अमेरिका होणार बाहेर; सत्तेत येताच ट्रम्प यांचा मोठा निर्णय)

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर न्या. आलोक आराधे यांची नियुक्ती ही महाराष्ट्र न्यायव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. त्यांच्या कार्यकाळाकडून न्यायव्यवस्थेतील सुधारणांसाठी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. (Alok Aradhe)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.