Ind vs Eng, T20 Series : इंग्लंड विरुद्धची टी-२० मालिका कुठे पाहू शकाल; काय आहेत वेळा?

Ind vs Eng, T20 Series : ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे

99
Ind vs Eng, T20 Series : इंग्लंड विरुद्धची टी-२० मालिका कुठे पाहू शकाल; काय आहेत वेळा?
Ind vs Eng, T20 Series : इंग्लंड विरुद्धची टी-२० मालिका कुठे पाहू शकाल; काय आहेत वेळा?
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि इंग्लंड दरम्यानची टी-२० मालिका बुधवार २२ जानेवारीपासून सुरू होत आहे. पहिला सामना कोलकात्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. महत्त्वाच्या चॅम्पियन्स करंडकापूर्वी हा सामना होणार असल्यामुळे दोन्ही संघांसाठी संघ बांधणीसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. सुरुवातीला टी-२० मालिका असल्यामुळे भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ५ सामन्यांची ही मालिका खेळणार आहे. तर नोव्हेंबर २०२३ नंतर पहिल्यांदा मोहम्मद शामी संघात परतला आहे. त्यामुळे भारतीयांचं लक्ष तर शामीवरच असेल. (Ind vs Eng, T20 Series)

तर संजू सॅमसनला अलीकडे जाहीर झालेल्या चॅम्पियन्स करंडकासाठीच्या संघात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे तोही आपलं महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने मालिकेत उतरेल. तीच गोष्ट नितिश कुमार रेड्डीचीही असेल. १५ जणांच्या संघात त्याला स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे तो ही एकदिवसीय आणि टी-२० संघासाठी आपली उपयुक्तता पटवून देण्याचा इरादा बाळगून असेल. (Ind vs Eng, T20 Series)

(हेही वाचा- राहुल गांधी हे ‘पप्पू टप्पू उडान टप्पू’; खासदार Dr. Anil Bonde यांची टीका)

तर इंग्लिश संघ बॅझबॉल क्रिकेटचा नवा अध्याय टी-२० क्रिकेटमध्ये सुरू करण्याच्या प्रयत्नात असतील. कसोटीमध्ये बॅझबॉल क्रिकेटने त्यांना मोठं यश मिळवून दिलं आहे. सॅम करन आणि विल जेक्स संघात नसले तरी जेकेब बेथेल आणि जोफ्रा आर्चरवर त्यांचा भरवसा असेल. कोलकात्यात संध्याकाळी पडणारं दव सामन्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतं. (Ind vs Eng, T20 Series)

या मालिकेतील ५ टी-२० सामने कुठल्या मैदानावर आणि कधी सुरू होणार आहे. तसंच त्याचं थेट प्रक्षेपण कुठली वाहिनी आणि ओटीटीवर होणार आहे ते पाहूया, (Ind vs Eng, T20 Series)

(हेही वाचा- WHO मधून अमेरिका होणार बाहेर; सत्तेत येताच ट्रम्प यांचा मोठा निर्णय)

सामने भारतात होणार असले तरी प्रसारण जिओवर होणार नाही. व्हायकॉम १८ आणि स्टार कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर आता स्टार स्पोर्ट्सवर क्रीडाविषयक प्रसारण होणार आहे. त्यामुळे हे सामनेही स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर (प्रादेशिक भाषेनुसार) प्रसारित होतील. तर डिस्नी हॉटस्टार या ओटीटी व्यासपीठावरही ते दाखवले जातील. (Ind vs Eng, T20 Series)

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-२० सामना बुधवार, २२ जानेवारी रोजी खेळला जाईल. जो कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल, तर दोन्ही कर्णधार अर्धा तास आधी म्हणजे संध्याकाळी साडेसहा वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. (Ind vs Eng, T20 Series)

(हेही वाचा- Shiv Sena UBT ची पळापळ!)

२२ जानेवारी – पहिला टी-२० सामना, कोलकाता (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता)
२५ जानेवारी – दुसरा टी-२० सामना, चेन्नई (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता)
२८ जानेवारी – तिसरा टी-२०, राजकोट (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता)
३१ जानेवारी – चौथा टी-२०, पुणे (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता)
२ फेब्रुवारी – पाचवा टी-२० सामना, मुंबई (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता)

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक). 

(हेही वाचा- न्या. Alok Aradhe यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली)

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड. 

 

हेही पहा-  

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.