Malegaon येथे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना बनावट जन्मदाखले; एसआयटीकडून छाननी सुरु

47
Malegaon येथे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना बनावट जन्मदाखले; एसआयटीकडून छाननी सुरु
Malegaon येथे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना बनावट जन्मदाखले; एसआयटीकडून छाननी सुरु

देशभरात बांगलादेशी (bangladeshi infiltrators) घुसखोरांविरूद्धची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मालेगाव (Malegaon, जिल्हा नाशिक) येथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना (Rohingya) तहसील कार्यालयातून बनावट जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

(हेही वाचा – Maharashtra Weather : राज्यात थंडी गायब, किमान तापमान वाढलं; हवामानाचा अंदाज काय ?)

किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्या आरोपांची दखल घेत सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास समितीने (एसआयटी) मंगळवार, २१ जानेवारी या दिवशी मालेगावला भेट देऊन चौकशी सुरू केली. समिती सदस्यांनी तहसील कार्यालयात दाखल २०० अर्जांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली. या अर्जदारांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन कागदपत्रांची छाननी करून तो शहराचा रहिवासी आहे कि नाही, याची खात्री केली जाणार आहे. पथकाने जन्म प्रमाणपत्र वितरणाचे अर्ज तपासणीसाठी कह्यात घेतले. यानंतर तहसीलच्या सभागृहात १५ शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली.

पहिल्या दिवशी २०० अर्ज छाननीसाठी घेण्यात आले. अर्ज छाननी करताना १५ ते १७ प्रश्नावलीच्या स्वतंत्र अर्जात माहिती भरून घेण्यात आली. यात अर्जदाराचे नाव, पत्ता, जोडलेले पुरावे, आई-वडिलांचे रहिवासी ठिकाण आदी प्रकारच्या माहितीचा समावेश आहे. सोमय्या यांनी मालेगाव तहसीलमधून ४ हजार जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वच अर्जांची छाननी करून पडताळणी होणार आहे. चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला ६ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या वेळी मनपा प्रशासक रवींद्र जाधव यांचीही उपस्थिती होती.

समाजवादी पार्टीला बांगलादेशींचा कैवार

मुसलमानांच्या मदतीसाठी समाजवादी पार्टीने (Samajwadi Party) १५ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. २६ जानेवारीनंतर ही समिती कायदेशीर लढा सुरू करेल, अशी माहिती समाजवादीचे नेते मुस्तकिम डिग्निटी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  (Malegaon)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.