मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात बांग्लादेशी घुसखोरांची (Bangladeshi Infiltrators) वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाणे, पुणेमध्ये बांगलादेशी नागरिकांवरील कारवाई वाढत आहे. त्यातच आता ग्रामीण भागात घुसखोरी केल्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान कोकणातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कणकवलीतील (Kankavali) एका लॉजमध्ये बांगलादेशी महिला देहविक्रय व्यवसाय करीत असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे कणकवलीतील एक मराठी तरुण हा लॉज चालवित होता. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली शहरातील लक्ष्मी लॉजचा (Lakshmi Lodge) मॅनेजर ओंकार विजय भावे (Omkar Vijay Bhave) (३२) याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली. बांगलादेशी महिलांकडून लॉजवर देह विक्रय व्यवसाय करून घेत असल्याचा त्याच्यावर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.(Bangladeshi Infiltrators)
हेही वाचा- Malegaon येथे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना बनावट जन्मदाखले; एसआयटीकडून छाननी सुरु
एटीएस पथकाने पकडलेल्या दोन बांगलादेशी महिलांकडून शहरातील लक्ष्मी लॉजवर देह विक्री व्यवसाय करवून घेत असल्याचे कणकवली पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी सोमवारी रात्री आठच्या सुमारास कणकवली पोलिसांनी लॉजचा मॅनेजर ओंकार विजय भावे याला ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी अधिक तपासासाठी न्यायालयाने भावे याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या दोन बांगलादेशी महिलांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून त्या दोघींना 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.(Bangladeshi Infiltrators)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community