-
ऋजुता लुकतुके
इंग्लंड विरुद्घच्या टी-२० मालिकेची सुरुवात बुधवारपासून (२२ जानेवारी) होत आहे. आणि या मालिकेत भारताचा उपकर्णधार असेल तो अक्षर पटेल. पण, तरीही हार्दिक पांड्या संघाच्या नेतृत्वाच्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू असल्याचं कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं आहे. ‘अक्षरवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. २०२४ च्या टी२० विश्वचषकातील त्याची कामगिरी फक्त गोलंदाजीपूरती मर्यादित नव्हती. गेली अनेक वर्ष तो संघाबरोबर आहे. त्यामुळे त्याला ही जबाबदारी मिळाली आहे,’ असं सूर्यकुमार यादव म्हणाला. (Ind vs Eng, T20 Series)
(हेही वाचा- Bangladeshi Infiltrators : कोकणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट; बांगलादेशी महिला करतात देहविक्री व्यवसाय)
पण, ते सांगताना सूर्यकुमारने हार्दिक पांड्याचं महत्त्व कमी केलं नाही. तो नेतृत्वाच्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू आहे असं सूर्यकुमार म्हणाला. ‘आम्ही ड्रेसिंग रुममध्ये एकत्र बसतो. काय रणनिती आखायची यावर विचार करतो. तेव्हा हार्दिकचा त्यात सक्रिय सहभाग असतो. अगदी मैदानावर उतरतो तेव्हाही तो कायम संघाबरोबर चर्चा करत असतो. हार्दिक आमच्या नेतृत्वाचा भाग आहे. तुम्ही असं म्हणा की, संघात अनेक कर्णधार आहेत,’ असं सूर्यकुमार हसून म्हणाला. (Ind vs Eng, T20 Series)
𝙏𝙝𝙖𝙩 𝙀𝙙𝙚𝙣 𝙂𝙖𝙧𝙙𝙚𝙣𝙨 𝙛𝙚𝙚𝙡𝙞𝙣𝙜 🏟️
ft. Captain Suryakumar Yadav 😎#TeamIndia | #INDvENG | @surya_14kumar | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/lB1MJse70w
— BCCI (@BCCI) January 21, 2025
हार्दिकबरोबर आपलं नातंही जुनं आणि मैत्रीचं असल्याचा सूर्यकुमारने आवर्जून उल्लेख केला. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक हे आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्स या एकाच फ्रँचाईजीचा भाग आहेत. आणि तिथेच कर्णधारपदावरून गेल्यावर्षी नाट्य निर्माण झालं होतं. मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीने संघाचं नेतृत्व ऐनवेळी रोहित शर्माकडून काढून घेऊन हार्दिक पांड्याकडे दिलं. ही गोष्ट फ्रँचाईजीच्या चाहत्या वर्गाला आवडली नाही. आणि मैदानावर हार्दिकचं नाव कुटेही घेतलं गेलं की, त्याला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. (Ind vs Eng, T20 Series)
(हेही वाचा- Ind vs Eng, T20 Series : टी-२० मध्ये संजू सॅमसनचं यष्टीरक्षक, कर्णधार सूर्याने केलं स्पष्ट )
स्वत: हार्दिक आणि मुंबई संघाच्या कामगिरीवरही याचा परिणाम झाला. आणि मुंबई संघ तळाला राहिला. हार्दिकची कामगिरीही चांगली होत नव्हती. त्यानंतर जून २०२४ मध्ये रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली तेव्हा भारतीय संघाची धुराही हार्दिक नाही तर सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली. तेव्हापासून सुर्यकुमार यादवने १० टी-२० सामन्यांत भारताचं नेतृत्व केलं आहे. आणि यात ९ विजय मिळवले आहेत. (Ind vs Eng, T20 Series)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community