पुण्यात (Pune) दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) आजाराने थैमान घातलं आहे. एकाच आठवड्यात २४ संशयित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पालिकेचे आरोग्य विभागही खडबडून जागे झाले आहे. अचानक रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने आरोग्य विभागाने शीघ्र कृती पथकाची स्थापना केली आहे. सर्व रुग्ण शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. तर, ८ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (Guillain Barre Syndrome)
संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल मिळेपर्यंत हे रुग्ण कोणत्या आजाराचे हे स्पष्ट करता येत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी याप्रकरणी शीघ्र कृती पथक स्थापन करण्याचा आदेश काढला आहे. (Guillain Barre Syndrome)
नेमका आजार काय?
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर (Neurological disorders) आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते. या स्थितीचा परिणाम स्नायुंमधील कमकुवतपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. दुर्मिळ असा गुइलेन बॅरे सिंड्रोम हा कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करू शकतो. (Guillain Barre Syndrome)
हेही वाचा- Malegaon येथे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना बनावट जन्मदाखले; एसआयटीकडून छाननी सुरु
जीबीएस (GBS) या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपाय मुंग्या येणे. या आजाराचे कारण सध्या माहीत नाही. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. पण गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात. गुइलेन बॅरे सिंड्रोम दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर दिसून आले आहे. त्याचवेळी काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगरसारखे कार्य करते. (Guillain Barre Syndrome)
लक्षणे (Guillain Barre Syndrome)
हात-पाय लूळे पडणे
चालताना तोल जाणे
अंग दुखणे
चेहरा सूजने
चालताना व गिळताना त्रास होणे
हेही पहा-
Join Our WhatsApp Community