Manipur Violence : मणिपूर पोलिसांना मोठे यश; 2 दहशतवाद्यांना अटक

34
Manipur Violence : मणिपूर पोलिसांना मोठे यश; 2 दहशतवाद्यांना अटक
Manipur Violence : मणिपूर पोलिसांना मोठे यश; 2 दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले असून पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये अटक करण्यात आली असून यातील एक जण पीपल्स लिबरेशन आर्मीचा (पीएलए) सदस्य होता तर दुसरा बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य होता. बुधवार, २२ जानेवारी रोजी पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. (Manipur Violence)

(हेही वाचा – Ind vs Eng, T20 Series : ‘हार्दिक पांड्या अजूनही संघाच्या नेतृत्वाच्या फळीत,’ – सूर्यकुमार यादव )

एका सक्रिय सदस्याला टोप खोंगनांगखोंग येथून बंदी घातलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) अटक करण्यात आली. येंगखोम भोगेन सिंग (वय ५० वर्षे) असे त्याचे नाव आहे. तर, बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीच्या (एमएफएल) एका सदस्याला मंत्रीपुखरी बाजार येथून अटक करण्यात आली आहे. पुखरामबम थोइबा सिंग (वय ३८ वर्षे) असे त्याचे नाव आहे.

यापूर्वी नवीन वर्षाच्या सुरुवातीला मणिपूरमधील इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील एका गावावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारीच्या पहाटे १ च्या सुमारास दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रांनी अनेक राऊंड गोळीबार केला आणि बॉम्ब फेकले. तर, यापूर्वीचं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेची माफी मागितली होती. त्यांनी मणिपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल खेद व्यक्त केला. तसेच आगामी वर्षात संपूर्ण राज्यात स्थिती पूर्ववत होईल, अशी आशा व्यक्त केली. (Manipur Violence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.