Karnataka Accident : कर्नाटकात भीषण अपघात; दोन वेगवेगळ्या घटनेत 14 ठार, 15 जण गंभीर जखमी

65
Karnataka Accident : कर्नाटकात भीषण अपघात; दोन वेगवेगळ्या घटनेत 14 ठार, 15 जण गंभीर जखमी
Karnataka Accident : कर्नाटकात भीषण अपघात; दोन वेगवेगळ्या घटनेत 14 ठार, 15 जण गंभीर जखमी

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर (Yallapur) तालुक्यात भीषण अपघात (Karnataka Accident) घडला आहे. यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापुर नजीक भाजीपाल्याने भरलेला ट्रक पलटी होऊन भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत ट्रकमधील १० जण ठार झाले असून घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Karnataka Accident)

अपघाताच्या घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू
दुसऱ्या दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांसमवेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचीही दुर्घटना घडली. कर्नाटकच्या रायपूर (Raipur) जिल्ह्यात ही घटना घडली. सिंधनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहन पलटी होऊन ही अपघाताची घटना घडली आहे. नरहरी मंदिरात पूजा करण्यासाठी विद्यार्थ्यांची कार हम्पीच्या तिर्थयात्रेसाठी निघालेली होती. मात्र, भीषण दुर्घटनेत कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे, कर्नाटकमधील अपघाताच्या घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे. (Karnataka Accident)

कन्नड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 63 (National Highway 63) वर बुधवारी 22 जानेवारी रोजी सकाळी ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. (Karnataka Accident)

धुक्याचे वातावरण असल्याने दुर्घटना घडली
दरम्यान पहाटेच्या सुमारास भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकसोबत घट्टा परिसरात पहाटे धुक्याचे वातावरण असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. धुक्याच्या वातावरणामुळे पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने लॉरी पुढच्या वाहनाला धडकली आणि चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर, बाजुच्या खड्ड्यात ट्रक पडली असल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघातातील जखमींना हुबळी किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यल्लापूर पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. (Karnataka Accident)

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटूंबियांना मदत
अपघाताच्या दोन्ही घटनांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 3 लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी संबंधितांना सूचनाही करण्यात आल्या आहेत. (Karnataka Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.