राज्यातील समाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असलेल्या दिलीप म्हस्के (Dilip Mhaske) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी (Donald Trump oath ceremony) समारंभात सहभाग नोंदवला आहे. यावेळी शपथविधी समारंभात दिलीप म्हस्के यांनी जागतिक नेत्यांसोबत सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
दिलीप म्हस्के हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, ते अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांशी (international organization) संबंधित आहेत. त्यांनी 1995 साली Foundation For Human Horizon ची स्थापना केली, जी आज संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला जगातील अनेक प्रभावशाली व्यक्ती आणि नेते उपस्थित होते. म्हस्के यांनी या नेत्यांसोबत व्यक्तिगत संवाद साधत जागतिक विकासासाठी त्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यामध्ये Amazon चे संस्थापक जेफ बेजोस यांच्याशी चर्चा करून, ई-कॉमर्सद्वारे ग्रामीण विकासाला चालना देण्याबाबत आणि भारतातील डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवण्यासाठी Amazon सारख्या कंपन्यांच्या सहकार्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. त्याचबरोबर मार्क झुकेरबर्ग यांच्याशी Meta च्या आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कसा करता येईल, यावर चर्चा झाली. झुकेरबर्ग यांनी म्हस्के यांच्या अफ्रिका प्रकल्पाबाबत कौतुक व्यक्त केले.
(हेही वाचा – १६ मंत्र्यांना अद्याप Personal Assistant ची प्रतीक्षा; कामात नक्की काय येत आहेत अडचणी ?)
टेसला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये म्हस्के यांनी भारतात ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी तर Alphabet चे सह-संस्थापक सर्गे ब्रिन यांच्यासोबत म्हस्के यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग शिक्षणासाठी कसा करता येईल, यावर सविस्तर चर्चा केली. त्याचसोबत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी, फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड आर्नॉल्ट, OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन आणि रुपर्ट मर्डोक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. दिलीप म्हस्के यांचा या शपथविधी समारंभातील सहभाग हा मराठी माणसासाठी आणि भारतासाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांनी जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करताना आपल्या कार्याची ओळख अधोरेखित केली आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी प्रयत्न केले.
(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूर पोलिसांना मोठे यश; 2 दहशतवाद्यांना अटक)
दिलीप म्हस्के यांनी याप्रसंगी ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ सल्लागारांशी संपर्क साधला. त्यांनी भारत-अमेरिका संबंध (Indo-US relations) दृढ करण्यासाठी सहकार्याची शक्यता मांडली. तांत्रिक विकास, स्वच्छ ऊर्जा, आणि शाश्वत विकास या विषयांवर त्यांच्या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दिलीप म्हस्के यांच्या सहभागाने महाराष्ट्र आणि भारताचे नाव जागतिक स्तरावर अधोरेखित केले आहे. जागतिक नेत्यांसोबतच्या या संवादातून भविष्यात भारताच्या प्रगतीसाठी नवनवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community