-
ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली रणजी करंडकाच्या ३० जानेवारीला सुरू होणाऱ्या फेरीत दिल्ली संघाकडून खेळणार हे निश्चित झालं आहे. आणि तो ठरल्याप्रमाणे खेळला तर नोव्हेंबर २०१२ नंतरचा हा त्याचा पहिलाच देशांतर्गत सामना असेल. विराट कोहली आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. दिल्लीचा सौराष्ट्रबरोबरचा सामना गुरुवारपासून सुरू होत आहे. या सामन्यासाठीच्या संभाव्य दिल्ली संघातही विराटचा समावेश होता. पण, विराटची मान दुखावल्यामुळे तो खेळणार नाहीए. (Virat Kohli)
(हेही वाचा- १६ मंत्र्यांना अद्याप Personal Assistant ची प्रतीक्षा; कामात नक्की काय येत आहेत अडचणी ?)
पण, ३० जानेवारीला रेल्वे विरुद्धच्या सामन्यात तो खेळेल असं त्याने कळवलं आहे. २०११ चा एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर नोव्हेंबर २०१२ मध्ये दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश या उत्तर विभागीय सामन्यात विराट खेळला होता. यात त्याने पहिल्या डावांत १३ आणि दुसऱ्या डावांत ४३ धावा केल्या होत्या. वीरेंद्र सेहवागने या सामन्यात दिल्लीचं नेतृत्व केलं होतं. आणि उत्तर प्रदेशने हा सामना ६ गडी राखून जिंकला होता. (Virat Kohli)
त्यानंतर काही वर्षांतच विराट भारतीय संघाचा कर्णधार झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामुळे देशांतर्गत क्रिकेट तो फारसं खेळलेलाच नाही. रणजी करंडकात विराटने आतापर्यंत दिल्लीसाठी फक्त २३ सामने खेळले आहेत. आणि यात ५० धावांच्या सरासरीने त्याने १,५७४ धावा केल्या आहेत. कोहलीने २००६ च्या हंगामात दिल्लीकडून रणजी पदार्पण केलं. तामिळनाडूविरुद्ध तो आपला पहिला सामना खेळला होता. (Virat Kohli)
(हेही वाचा- Manipur Violence : मणिपूर पोलिसांना मोठे यश; 2 दहशतवाद्यांना अटक)
त्यानंतर ऑगस्ट २००८ मध्ये लगेचच भारतीय संघात त्याची निवड झाली. आणि तो श्रीलंकेविरुद्घ भारतीय संघात खेळलाही. पाठोपाठ टी-२० संघातून तो खेळला. आणि २० जून २०११ ला तो भारताकडून पहिला कसोटी सामना खेळला. तेव्हापासून तो १२३ कसोटी, २९५ एकदिवसीय सामने आणि ११५ टी-२० सामने भारताकडून खेळला आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १४५ सामन्यांमध्ये ११,०९७ धावा जमा आहेत. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community