छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उबाठाला खिंडार; ५० पदाधिकाऱ्यांचा BJP मध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्वागत

47
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उबाठाला खिंडार; ५० पदाधिकाऱ्यांचा BJP मध्ये प्रवेश
  • प्रतिनिधी

शिवसेना उबाठातील ५० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील भाजपा (BJP) प्रदेश कार्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात या पदाधिकाऱ्यांचे भाजपामध्ये स्वागत करण्यात आले.

या वेळी खासदार डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सचिव किरण पाटील, नवनाथ पडळकर, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी सरपंच, उप शहर प्रमुख, युवा सेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूर पोलिसांना मोठे यश; 2 दहशतवाद्यांना अटक)

भाजपामध्ये प्रवेश का ?

भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शिवसेना उबाठाने हिंदुत्व विचारधारा सोडून काँग्रेसची विचारधारा स्वीकारल्याने त्यांच्या गटातील हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांची घुसमट होत होती. ही घुसमट सहन न होऊन त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

बावनकुळे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी हे कार्यकर्ते भाजपाला (BJP) साथ देत आहेत. या पक्ष प्रवेशामुळे संभाजीनगरमधील भाजपाची ताकद निश्चितच वाढणार आहे. पक्षात प्रवेश केलेल्या प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल.”

(हेही वाचा – Devendra Fadnavis : एसटीसाठी १३१० गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा रद्द; नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश)

प्रवेश केलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे

भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी सरपंच, शिवसेना उबाठाचे तालुका समन्वयक सचिन कल्याणराव गरड पाटील, उपशहर प्रमुख बिबन सय्यद, किशोर खांडे, विभाग प्रमुख सुरेश जगताप, नवनाथ मनाळ, शाखाप्रमुख तुषार ठवळे, विश्वजीत पोळे, महिला आघाडीच्या कमलाबाई गरड, लताताई माळी, युवा सेनेचे तालुका प्रमुख विजय सरकटे, तालुका अधिकारी प्रशांत पाथ्रीकर, उप तालुका अधिकारी सुरज वाघ, शहर प्रमुख प्रणव तवले, विभाग प्रमुख निखील फरताळे यांसह अनेकांचा समावेश आहे.

भाजपासाठी महत्त्वपूर्ण टप्पा

हा पक्ष प्रवेश आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपासाठी (BJP) महत्त्वाचा मानला जात आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावेळी नजिकच्या काळात आणखी अनेक जण भाजपामध्ये येणार असल्याचे सांगितले. संभाजीनगरमधील भाजपाची (BJP) ताकद वाढवण्यासाठी आणि हिंदुत्व विचारधारेचा प्रचार करण्यासाठी हा पक्ष प्रवेश महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.