मुंबई ते नवी मुंबई (Travel from Mumbai to Navi Mumbai) प्रवास केवळ १२ ते १५ मिनिटांत करणे अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूमुळे (Shivadi-Nhava Sheva Sea Bridge) शक्य झाले आहे. हा सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन सोमवार, १३ जानेवारी रोजी एक वर्षे पूर्ण झाले. दरम्यान, आता या सेतुवरून प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना खानपानासह इंधनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (Atal Setu)
दरम्यान, अटल सेतूच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जासई येथे फूड प्लाझा (Atal Setu Food Plaza) आणि पेट्रोल पंपची (Atal Setu Petrol Pump) सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) घेतला आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू असून येत्या काही महिन्यात ही सुविधा कार्यान्वित होणार आहे. मात्र सागरी सेतूवरुन प्रवास करताना वाहनचालक-प्रवाशांसाठी खानपानाची वा इंधनाची सुविधा उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता आता एमएमआरडीएने अटल सेतूवर फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप विकसित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. अटल सेतूच्या नवी मुंबईच्या दिशेच्या असलेल्या जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप बांधण्यात येणार आहे. या दोन्ही सुविधा खासगी कंपनीच्या माध्यमातून विकसित केल्या जाणार आहे.
(हेही वाचा – Karnataka Accident : कर्नाटकात भीषण अपघात; दोन वेगवेगळ्या घटनेत 14 ठार, 15 जण गंभीर जखमी)
अटल सेतूच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकांवर जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप असणार आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यास वाहनचालक-प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. मुंबई – नवी मुंबई अंतर केवळ १२ मिनिटात पार करता यावे यासाठी एमएमआरडीएने २१.८० किमी लांबीचा सागरी सेतू बांधला. या सेतूवरून दिवसाला सरासरी २२ हजार ५०० वाहने धावतात. त्यामुळेच सागरी सेतूमुळे (Sea bridge) प्रवास अतिजलद झाला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community