भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (Telecom Regulatory Authority of India) म्हणजेच ट्रायने एक नवीन नियम जारी केला आहे, ज्यामध्ये रिचार्ज न करता सिमकार्ड (SIM card) दीर्घकाळ सक्रिय ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तुम्ही फोनमध्ये दोन सिम वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड वापरणाऱ्यांना किमान रिचार्ज करावे लागेल, जेणेकरून सिम कार्ड ब्लॉक होणार नाही. ट्रायने या प्रकरणी मोबाईल वापरकर्त्यांना काहीसा दिलासा दिला आहे. याचा अर्थ असा आहे की रिचार्ज न करता सिम कार्ड दीर्घकाळ सक्रिय ठेवता येते, त्यामुळे Jio , Airtel , Vodafone Idea आणि BSNL सिम रिचार्ज न करता किती दिवस ॲक्टिव्ह राहू शकतो. (TRAI)
जिओ सिम कार्ड वैधता नियम
रिलायन्स जिओ सिम कार्ड रिचार्ज (jio sim card) न करता ९० दिवस ॲक्टिव्ह ठेवता येते. सिम ९० दिवसांनंतर पुन्हा सक्रिय करावे लागेल. तुमच्या शेवटच्या रिचार्ज प्लॅनच्या आधारावर, इनकमिंग कॉल एक महिना किंवा काही आठवड्यांसाठी ब्लॉक केले जाऊ शकतात. यानंतरही सिमकार्ड रिचार्ज (SIM card recharge) न केल्यास ते तात्पुरते बंद केले जाईल. तसेच तो नंबर इतर काही युजरला दिला जाईल.
(हेही वाचा – Metro Line-4 : स्थापत्य कामात तब्बल 1274.80 कोटींची वाढ; 5 वर्षांची प्रकल्प दिरंगाई उघड)
एअरटेल सिम कार्ड वैधता नियम
एअरटेल सिम कार्ड कोणत्याही रिचार्जशिवाय ९० दिवस किंवा त्याहून अधिक काळ सक्रिय ठेवता येते. यानंतर यूजरला 15 दिवसांची अतिरिक्त सूट मिळते. या कालावधीत वापरकर्त्याला रिचार्ज करणे बंधनकारक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास मोबाईल नंबर कायमचा लॉक केला जाईल. तसेच ते सिम दुसऱ्या कोणाला तरी दिले जाईल.
vi सिम कार्ड वैधता नियम
वापरकर्ते त्यांचे सिम कार्ड रिचार्ज न करता ९० दिवस ॲक्टिव्ह ठेवू शकतात. तुम्हाला तुमचे सिम सक्रिय ठेवायचे असेल तर तुम्हाला ते किमान 49 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.
(हेही वाचा – Shiv Sena : मातोश्रीच्या परिसरात शिवसेनेची जोरदार बॅनरबाजी; राजकीय संघर्ष तीव्र)
बीएसएनएल सिम कार्डच्या वैधतेचे नियम
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL चे सिम रिचार्ज न करता जास्तीत जास्त दिवस ॲक्टिव्ह ठेवता येते. हे रिचार्ज न करता सुमारे 180 दिवस सक्रिय ठेवता येते. ज्या वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज टाळायचे आहे त्यांच्यासाठी हा दीर्घ प्लॅन चांगला पर्याय आहे.
₹20 बॅलेन्स आणि सिम अॅक्टिव्हेशन करण्याचा नियम
सिम 90 दिवसांसाठी रिचार्ज केले नसेल आणि 20 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त बॅलेन्स असेल, तर बॅलेन्स वजा केली जाईल आणि सिम आणखी 30 दिवस अॅक्टिव्ह ठेवले जाईल. पण बॅलेन्स नसेल तर सिम बंद करून नवीन ग्राहकाला दिले जाईल.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community