- प्रतिनिधी
मराठवाड्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आणि शाश्वत पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत, मराठवाड्यातील ११ मोठी धरणे पाईपलाइनद्वारे जोडून संपूर्ण प्रदेशातील शहरे आणि गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी याबद्दल माहिती दिली आणि या प्रकल्पामुळे मराठवाड्याला पाणीपुरवठ्याचे शाश्वत समाधान मिळणार असल्याचे स्पष्ट केले.
(हेही वाचा – Uttarakhand मध्ये २६ जानेवारीपासून लागू होणार समान नागरी कायदा)
योजना राबवण्यासाठी जागतिक स्तरावरील बँकांचा सहभाग घेतला जाणार असल्याचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या संदर्भात मंत्रालयात जागतिक बँकांच्या प्रतिनिधींशी एक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, जल जीवन मिशन अभियानाचे संचालक ई रवींद्रन, आणि जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे यांच्यासह बऱ्याच महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
(हेही वाचा – Jay Shah Meets Thomas Bach : जय शाह आणि थॉमस बाख यांच्यात क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशावर चर्चा)
या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दीर्घकालीन पाणी पुरवठा सुनिश्चित केला जाणार आहे. यासोबतच, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, प्रकल्पाची उभारणी वर्ल्ड बँक, आशियायी विकास बँक आणि न्यू डेव्हल्पमेंट बँक यांच्या माध्यमातून कर्ज घेत निधी उभारणी करून अंमलबजावणी केली जाईल. या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘मित्रा’ संस्थेच्या समन्वयातून केली जाईल, असे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले. यावर अधिक चर्चा करण्यासाठी व संबंधित बँकांशी समन्वय साधण्यासाठी ‘मित्रा’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईला दूर करण्यास महत्त्वाची मदत मिळणार आहे, असा विश्वास गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community