जळगाव येथील परंडा रेल्वे स्थानकावर (Paranda Railway Station) भीषण अपघात झाला आहे. पुष्पक एक्स्प्रेसच्या (Pushpak Express accident) प्रवाशांना कर्नाटक एक्स्प्रेसने चिरडले. वास्तविक, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी घाईघाईने ट्रेनमधून उडी मारली. त्याचवेळी विरुद्ध दिशेने कर्नाटक एक्स्प्रेस (Karnataka Express) येत होती. त्यामुळे पुष्पक एक्स्प्रेसच्या अनेक प्रवाशांना कर्नाटक एक्स्प्रेसची धडक बसली. (Jalgaon Train Accident)
या भीषण अपघातात 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 12 जखमींना पाचोरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जळगावपासून 20 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसच्या किमान 8 प्रवाशांनी बोगीतून उडी मारली आणि त्यांना पलीकडून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने धडक दिली. पुष्पक एक्सप्रेस लखनौहून मुंबईला जात होती.
(हेही वाचा – वाहनचालकांसाठी खुशखबर! Atal Setu वर होणार ‘पेट्रोल पंप’ आणि ‘फूड प्लाझा’)
नेमकं काय घडलं ?
B4 बोगीमध्ये आगीच्या ठिणग्या उडाल्याने पुष्पक एक्स्प्रेस थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यामुळेच ट्रेन थांबवण्यात आली. लोकांनी घाईघाईने ट्रेनमधून उडी मारली आणि रुळावर आले. त्याचवेळी मनमाडहून भुसावळकडे जाणारी कर्नाटक एक्स्प्रेस दुसऱ्या ट्रॅकवरून गेली. कर्नाटक एक्स्प्रेसने (Karnataka Express) या प्रवाशांना चिरडले. यामध्ये 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला.
हेही पाहा –