जळगावमध्ये एका अफवेमुळे मोठा रेल्वे अपघात (Jalgaon Train Accident) झाला, त्यामध्ये १२ प्रवाशांचा चिरडून मृत्यू झाला. या अपघातात जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या लखनौच्या एका प्रवाशाने काय घडले, याबद्दल माहिती दिली. बुधवारी, २२ जानेवारीला दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
जळगाव स्थानकावरुन दुपारी ४ वाजता पुष्पक एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली होती. माहिजी-परधाडे स्थानक येण्यापूर्वी एका बोगीत चैन ओढली गेली. त्यानंतर वेगात असलेल्या रेल्वेगाडीने अचानक ब्रेक दाबायला (Jalgaon Train Accident)
या अपघातात जखमी झालेल्या लखनौच्या एका प्रवाशाने सांगितले की, ‘एक चहावाला म्हणाला की ट्रेनमध्ये आग लागली आहे. रेल्वे उभी होती. त्यामुळे सगळे पळायला लागले. खाली उतरून पळत असताना समोरून ट्रेन (कर्नाटक एक्स्प्रेस) आली. इंजिननंतर तीन डब्बेच एक्स्प्रेसने पार केले. जर पूर्ण ट्रेन पार करून कर्नाटक एक्स्प्रेस गेली असती, तर सगळेच्या सगळे मेले असते. पुष्पक एक्स्प्रेस थांबलेली होती. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालात १२ जणांचे मृतदेह दाखल झाले. तर ५ जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Jalgaon Train Accident)
Join Our WhatsApp Community