मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत, जखमींवर मोफत उपचार – मुख्यमंत्री Devendra Fadnavis

63

मुंबई प्रतिनिधी:

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे झालेल्या भीषण (Jalgaon Train Accident) अपघातात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस (Davos) येथून केली. (Devendra Fadnavis)

प्रशासनाचा बचावकार्याचा आढावा

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी लवकरच घटनास्थळी पोहोचतील. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यासाठी ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज तसेच ग्लास कटर, फ्लडलाइट्स आणि इतर आवश्यक उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन रेल्वे (Railway) प्रशासनाशी समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे. जखमींवर वेळ न घालवता उपचार सुरू करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

(हेही वाचा – Tata Steel Chess 2025 : टाटा स्टील स्पर्धेत प्रग्यानंदाने मिळवली आघाडी, अर्जुन एरिगसीचा तिसरा पराभव)

मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. मी जिल्हा प्रशासनाशी संपर्कात असून प्रत्येक गरज लक्षात घेऊन मदत पुरवली जाईल.” मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या दुर्घटनेत दहा ते अकरा जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची सविस्तर माहिती घेतली. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी त्यांनी आदेश दिले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य वेगाने सुरू आहे. संपूर्ण यंत्रणा सक्रिय या दुर्घटनेमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी जिल्हा यंत्रणा आणि इतर प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.

(हेही वाचा – माजी खासदार Rahul Shewale यांच्या मागणीची दखल; केंद्राने राज्याला दिले ‘हे’ निर्देश)

जळगाव जिल्ह्यातील या दुर्घटनेने राज्याला धक्का दिला आहे. सरकारने केलेली आर्थिक मदत आणि जखमींवर मोफत उपचाराची घोषणा दिलासा देणारी ठरली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाचे मदतकार्य सुरू आहे. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.