अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरून इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी (21 जाने.) सांगितले की, पुतीन युद्धाबाबत वाटाघाटी करण्यास तयार नसतील तर अमेरिका रशियावर निर्बंध लादेल. पुतीन यांच्याशी बोलण्यासाठी आणि वैयक्तिकरित्या भेटण्यासाठी मी नेहमीच तयार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. (Donald Trump)
हेही वाचा-TRAI ने दिली गुडन्यूज: व्हॅलिडिटी संपली तरी लगेच रिचार्ज करण्याचं ‘नो टेन्शन’!
माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, “युक्रेनमधील युद्ध कधीच सुरू व्हायला नको होते. येथील परिस्थिती भयानक आहे आणि लाखो लोक मरत आहेत. जर अमेरिकेकडे सक्षम राष्ट्राध्यक्ष असते तर हे युद्ध कधीच झाले नसते. जर मी राष्ट्राध्यक्ष असतो तर हे घडले नसते.” ट्रम्प यांनी असाही दावा केला की, त्यांच्या कार्यकाळात रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याचे धाडस केले नाही. (Donald Trump)
हेही वाचा- Petrol-Diesel Vehicles : मुंबई महानगर क्षेत्रात पेट्रोल-डिझेल वाहनांवर येणार निर्बंध?
“१० लाख रशियन सैनिक मारले गेले, देश चालवण्याचा हा मार्ग नाही. ७ लाख युक्रेनियन सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. रशिया मोठ्या संकटात आहे. तुम्ही त्यांची अर्थव्यवस्था पाहा, त्यांचा महागाई दर पाहा.” असे ट्रम्प म्हणाले. (Donald Trump)
हेही वाचा- अंपायरिंगचे शतक पूर्ण करणाऱ्या Anil Dandekar यांचा बीसीसीआयकडून सत्कार
ट्रम्प यांनी पुढे सांगितलं की, “चीनवर शुल्क लादण्याचा निर्णय ते मेक्सिको आणि कॅनडाला ‘फेंटानिल’ पाठवत आहेत की नाही यावर आधारित असेल. टीम १ फेब्रुवारीपासून चीनवर १० टक्के शुल्क लादण्याचा विचार करत आहे. ‘फेंटानिल’ हा एक प्रकारचा अमली पदार्थ आहे जो हेरॉइनपेक्षा ५० पट जास्त शक्तिशाली आणि व्यसन लावणारा आहे. वस्तुस्थितीच्या आधारे आम्ही त्यावर ५० टक्के शुल्कही लादण्याचा विचार करत आहोत.” असं ट्रम्प म्हणाले. ट्रम्प पहिल्या दौऱ्यात ते शुक्रवारी लॉस एंजेलिस, नेवाडा आणि उत्तर कॅरोलिना येथे जाणार असल्याचे सांगण्यात आले. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community