- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये आपणच बादशाह असल्याचं दाखवून देत पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ७ गडी राखून आरामात पराभव केला. ईडन गार्डन्स मैदानावर भारतीय संघाने नाणेफेकीपासूनच वर्चस्व गाजवलं. कारण, ती जिंकून सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. आणि अर्शदीप सिंगने त्यांना सुरुवातीपासून धक्के दिले. फील सॉल्ट (०) आणि बेन डकेट (४) यांना त्याने झटपट बाद केलं. या धक्क्यातून इंग्लिश फलंदाज सावरलेच नाहीत. कर्णधार जोस बटलरचा (Jos Buttler) अपवाद वगळता एकही खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही. बटलरने ६८ धावा केल्या. पण, इंग्लिश संघ १३२ धावांच करू शकला. आणि हे मामुली आव्हान भारतीय संघाने मात्र तेराव्या षटकातच पार केलं. आणि ७ गडी आणि ४३ चेंडू राखून विजय मिळवला. (Ind vs Eng, 1st T20)
भारतासाठी पहिल्या सत्रात अर्शदीप, वरुण आणि अक्षर चमकले. तिघांनी मिळून फलंदाजांवरील दडपण कायम ठेवलं. थोडासा जम बसतोय असं वाटत असताना फलंदाज बाद होत गेले. यात वरुण चक्रवर्तीने बाजी मारली. जम बसलेल्या हॅरी ब्रूक (१७) ला त्याने त्रिफळाचीत करून इंग्लिश फलंदाजीची हवाच काढून घेतली. त्यानंतर लियम लिव्हिंगस्टोनलाही त्याने झटपट बाद केलं. तर शेवटच्या षटकांत बटलरचाही बळी त्यानेच मिळवला. त्याने २३ धावांत ३ बळी मिळवले. तर अक्षरनेही २२ धावांत २ बळी मिळवले. तर अर्शदीप आणि हार्दिकने प्रत्येकी २ बळी मिळवले. गोलंदाजांनी आपलं काम केल्यावर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांनीही खेळावरील नियंत्रण सुटू दिलं नाही. (Ind vs Eng, 1st T20)
(हेही वाचा – TRAI ने दिली गुडन्यूज: व्हॅलिडिटी संपली तरी लगेच रिचार्ज करण्याचं ‘नो टेन्शन’! )
𝗔 𝗱𝗼𝗺𝗶𝗻𝗮𝘁𝗶𝗻𝗴 𝘀𝗵𝗼𝘄 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗘𝗱𝗲𝗻 𝗚𝗮𝗿𝗱𝗲𝗻𝘀! 💪 💪#TeamIndia off to a flying start in the T20I series, sealing a 7⃣-wicket win! 👏 👏
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/hoUcLWCEIP
— BCCI (@BCCI) January 22, 2025
संजूने आधी आक्रमक सुरूवात केली. आणि अभिषेकने भोपळाही फोडला नव्हता तेव्हाच तो १८ चेंडूंत २३ धावांवर पोहोचला होता. पण, उंच फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला. आणि तिथून अभिषेकने आक्रमण सुरू केलं. पुढे ८ षटकार आणि ५ चौकारांची आतषबाजी त्याने केली. भारताची धावगती क्षणात षटकामागे १० वर आली. आणि भारताचा विजय सुनिश्चित झाला. (Ind vs Eng, 1st T20)
(हेही वाचा – मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत, जखमींवर मोफत उपचार – मुख्यमंत्री Devendra Fadnavis)
Abhishek Sharma weaving magic and how! 🪄
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs #TeamIndia | #INDvENG | @IamAbhiSharma4 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5xhtG6IN1F
— BCCI (@BCCI) January 22, 2025
तो बाद झाल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) शून्यावर बाद झाला. पण, त्यानंतर तिलक वर्माने नाबाद १९ आणि हार्दिकने नाबाद ३ धावा करत भारताला विजय पूर्ण केला. ईडन गार्डन्सवर भारतीय फिरकीपटू अचूक कामगिरी करत असतानाच इंग्लंडकडून आदील रशिद प्रभावी ठरला नाही. त्याच्या २ षटकांत २७ धावा निघाल्या. तर गस ॲटकिनसनच्या २ षटकांतही ३८ धावा निघाल्या. भारतीय संघाने आता मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पुढील सामना २५ जानेवारीला चेन्नईत होणार आहे. भारतीय संघाने या सामन्यात तीन फिरकीपटू खेळवले. पण, मोहम्मद शमी मात्र आश्चर्यकारकरित्या खेळला नाही. त्यामुळे त्याच्या दुखापतीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. (Ind vs Eng, 1st T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community