Ind vs Eng, 1st T20 : इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० त मोहम्मद शमी का खेळला नाही?

Ind vs Eng, 1st T20 : ‘आम्ही ताकदीनुसार खेळतोय,’ असं सूर्यकुमार म्हणाला.

49
Ind vs Eng, 1st T20 : इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० त मोहम्मद शमी का खेळला नाही?
Ind vs Eng, 1st T20 : इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० त मोहम्मद शमी का खेळला नाही?
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवड जाहीर झाली तेव्हा मोहम्मद शमीचं (Mohammed Shami) नाव संघात बघून सगळ्यांनी सुस्कारा सोडला. ४३३ दिवसांनंतर शमीचा राष्ट्रीय संघात समावेश झाला असा मथळाही दुसऱ्यादिवशी वृत्तपत्रांमध्ये झळकला. अशावेळी इंग्लंड विरुद्ध पहिला टी-२० सामना खेळताना भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अंतिम अकरा जणांचा संघ निवडला तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. त्यात शमी नव्हता. अर्शदीप हा एकमेव तेज गोलंदाज होता. आणि त्याला साथ देणारा दुसरा गोलंदाज होता अष्टपैलू हार्दिक पंड्या. (Hardik Pandya)

नाणेफेकीनंतर टीव्ही प्रसारण वाहिनीशी बोलताना सूर्यकुमारने रोखठोक उत्तर दिलं. ‘आम्ही आमच्या ताकदीवर खेळणार आहोत. आमची ताकद ओळखून आम्ही संघ निवड केली आहे,’ इतकंच तो म्हणाला. त्याला शमीविषयी विचारलंही नाही. आणि त्याने उत्तरही दिलं नाही. पण, याचा अर्थ असा होतो की, संघासाठी सर्वोत्तम ११ खेळाडू निवडताना त्या रणनीतीत शामी बसत नव्हता आणि त्याला या सामन्यासाठी वगळण्यात आलं होतं. (Ind vs Eng, 1st T20)

(हेही वाचा – सत्तेवर येताच Donald Trump अॅक्शन मोडवर ; पुतिन यांना दिला युद्ध थांबविण्याचा इशारा)

नाणेफेकीपूर्वी संघाने मैदानातच सराव केला, तेव्हा शमी (Mohammed Shami) गोलंदाजी करताना दिसला. फक्त त्याने गुडघ्याभोवती कॅप लावली होती. त्यामुळे मग काहींनी दुखापतीची शंकाही व्यक्त केली. पण, भारतीय संघाने अशा कुठल्याही दुखापतीविषयी माहिती दिलेली नाही. त्यामुळे संघाची रणनीतीच अशी होती, जिथे एक तज्ज तेज गोलंदाज (अर्शदीप) आणि दोन अष्टपैलू कामचलाऊ गोलंदाज (हार्दिक व नितिश) खेळवायचे. (Ind vs Eng, 1st T20)

शमी नुकताच दुखापतीतून सावरला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर (नोव्हेंबर २०२३) तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. या मालिकेतील ५ टी-२० सामने तसंच ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स करंडक त्याला खेळायचा आहे. अशावेळी त्याला जपून वापरण्याचाच संघ प्रशासनाचा विचार दिसत आहे. (Ind vs Eng, 1st T20)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.