-
ऋजुता लुकतुके
भारताचा युवा तेज गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) टी-२० क्रिकेटमध्ये एक नवीन मापदंड सर केला आहे. इंग्लंडविरुद्ध १७ धावांत २ बळी मिळवत त्याने भारताकडून सर्वाधिक टी-२० बळी मिळवण्याचा मान पटकावला आहे. या बाबतीत त्याने युजवेंद्र चहलला मागे टाकलं. त्याच्या नावावर आता ६१ सामन्यांत ९७ बळी झाले आहेत. स्ट्राईकरेट आणि सातत्याच्या बाबतीत तो सध्या बुमराहनंतर भारताचा सर्वोत्तम टी-२० गोलंदाज आहे. (Ind vs Eng, 1st T20)
कोलकाता इथं खेळताना अर्शदीपने (Arshdeep Singh) सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर इंग्लिश सलामीवीर फील सॉल्टला त्रिफळाचीत केलं. तर त्याच्या पुढच्या षटकात त्याने डावखुऱ्या बेन डकेटलाही माघारी पाठवलं. रिंकू सिंगने हा अफलातून झेल पकडला. अर्शदीपचे आता ९७ बळी झाले आहेत. (Ind vs Eng, 1st T20)
(हेही वाचा – Western Railway चे निरीक्षण व नियंत्रण एकाच ठिकाणाहून होणार ; काय आहे नवीन प्रणाली ?)
भारताकडून सर्वाधिक टी-२० बळी,
९७ – अर्शदीप सिंग (६१ सामने)
९६ – युजवेंद्र चहल (८० सामने)
९० – भुवनेश्वर कुमार (८७ सामने)
८९ – जसप्रीत बुमराह (८० सामने)
८९ – हार्दिक पंड्या (११० सामने)
यापूर्वी चहलच्या नावावर हा विक्रम होता. आणि ८० सामन्यांत त्याने ९६ बळी मिळवले आहेत. त्याच्या पाठोपाठ भुवनेश्वर कुमारने ८७ सामन्यांत ९० बळी मिळवले आहेत. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्यानेही (Hardik Pandya) ८९ बळी मिळवले आहेत. पण, त्यासाठी बुमराहने ८० तर हार्दिकने ११० सामने खेळले आहेत. पण, अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) मात्र अलीकडे टी-२० क्रिकेटमध्ये चांगलीच मजल मारली आहे. फलंदाजाला पेचात पाडून अचूक यॉर्कर टाकण्याची त्याची हातोटी आणि शेवटच्या षटकांमध्ये प्रभावी गोलंदाजी करण्याची क्षमता यामुळे तो कर्णधाराचा भरवशाचा गोलंदाज झाला आहे. (Ind vs Eng, 1st T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community