मुंबईमधील दादर परिसरात टोरेस नावाच्या (Torres Scam) कंपनीनं कमी कालावधीत पैसे दुप्पट करुन देण्याचं आमिष दाखवत गुंतवणुकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या प्रकारानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. (Torres Scam)
हेही वाचा-Temple Management : पुणे विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापनाचे धडे देणार ; ‘असा’ असेल अभ्यासक्रम
यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात काहींना अटक करण्यात आलेलं आहे. दरम्यान, आता या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई करत मुंबई आणि जयपूरमधील तब्बल १० ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. (Torres Scam)
ईडीने टोरेस ज्वेलरी फसवणुकीच्या संबंधित मुंबई आणि जयपूरमधील दहा ठिकाणी छापे टाकले आहेत. यासंदर्भातील वृत्त इकोनॉमिक्स टाईम्सने दिलं आहे. तसेच टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणात काही आरोपींनी ३० डिसेंबर २०२४ पूर्वीच भारतातून पलायन केल्याची माहिती देखील सांगितली जात आहे. (Torres Scam)
दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे. टोरेस गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या कर्तव्यात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कसूर केली, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले. घोटाळ्याबाबत कोणीही तत्परता दाखविली नाही. पोलिसांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. सामान्यांनी कष्टाने कमावलेले पैसे गमावण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये, यासाठी तत्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे, असे खंडपीठाने नमूद केले आहे. (Torres Scam)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community