अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची (US Presidents) सूत्रे हातात घेताच जन्मत: नागरिकत्वावर बंदी घालण्याची घोषणा केली. हा नियम बदलण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या कार्यकारी आदेशाला आता भारतीय-अमेरिकन सिनेटर्सनी विरोध केला आहे.
(हेही वाचा – Torres Scam प्रकरणात मुंबई, जयपूरसह ईडीची १० ठिकाणी छापेमारी)
भारतीय-अमेरिकन काँग्रेस सदस्य रो खन्ना म्हणाले, नागरिकत्व नियमात बदल केल्याने केवळ बेकायदा व कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांच्या नवजात बाळांवरच परिणाम होणार नाही तर एच-१बी व्हिसावर कायदेशीररीत्या जन्मलेल्यांवरही त्याचा परिणाम होईल. अन्य सदस्य श्री ठाणेदार म्हणाले की, हा देशाचा कायदा आहे आणि राहील. मी कोणत्याही परिस्थितीत त्याचे रक्षण करण्यासाठी लढेन.
ट्रम्प (Donald Trump) यांच्या या आदेशाला इमिग्रेशन हक्क (Immigration rights) गटाने कोर्टात आव्हान दिले आहे. सध्या अमेरिकेत 48 लाख भारतीय-अमेरिकन रहिवासी आहेत. यापैकी 16 लाख अमेरिकेत जन्मले आहेत. ट्रम्प यांचे धोरण लागू झाल्यास या लोकांचे नागरिकत्व धोक्यात येऊ शकते. याशिवाय, अमेरिकेत जन्मलेल्या लाखो मुलांचेही अधिकार काढून घेतले जातील. परिणामी, अमेरिकेच्या प्रशासनावर अतिरिक्त भार पडेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community