- प्रतिनिधी
राजधानीत सर्वच पक्षाचा उत्साहात प्रचार सुरु आहे. भाजपा आणि आप मध्ये चढाओढ सुरु आहे. तर दिल्लीमध्ये एकूण ७० जागांवर ६९९ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. दिल्ली विधानसभेच्या लढाईमध्ये आता एकूण ६९९ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. नवी दिल्लीच्या जागेवर २३ उमेदवार एकमेकांविरोधात लढतील, त्याच वेळी, कस्तुरबा नगर आणि पटेल नगरमधून प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात आहेत. (Delhi Assembly Election)
आता निवडणूक रिंगणात ६९९ उमेदवार शिल्लक आहेत. नवी दिल्ली विधानसभेत अर्ज दाखल केलेले सर्वाधिक उमेदवार आहेत. आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विधानसभा मतदारसंघात २३ उमेदवारांचे अर्ज वैध आढळले. यामध्ये चार महिला उमेदवारांचाही समावेश आहे. तर, भाजपाकडून प्रवेश वर्मा आणि काँग्रेसकडून संदीप दीक्षित निवडणूक रिंगणात आहेत. जनकपुरीमध्ये १६ उमेदवार आहेत. या दोन्ही मतदारसंघात एकाच वेळेस दोन ईव्हीएम वापराव्या लागतील. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Balasaheb Thackeray यांना भारतरत्न द्यावा; संजय राऊत यांची मागणी)
त्याचवेळी, कस्तुरबा नगर विधानसभेत फक्त आप, भाजपा, काँग्रेस, बसपा आणि एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. पटेल नगरमध्येही आप, काँग्रेस, भाजपा, बसपा आणि आणखी एका छोट्या पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. १८ जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत नामांकन पत्रांची छाननी करण्यात आली. १५२२ नामांकन अर्जापैकी ७१९ नामांकन अर्ज वैध आढळले. सोमवारी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी, २० उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे निवडणूक रिंगणात ६९९ उमेदवार शिल्लक आहेत. (Delhi Assembly Election)
२०२० च्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण उमेदवारांची संख्या ६७२ होती. यावेळी ही संख्या ६९९ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक २८ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांनी प्रचाराची गती वाढवली आहे. यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होण्याची शक्यता वाढली आहे. निवडणूक आयोगाने मतदारांना याबद्दल तक्रार करण्यासाठी सी-व्हिजिल अॅप नावाचे एक शस्त्र दिले आहे. (Delhi Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community