राज्यात आदर्श आदिवासी गाव, स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ उभारणार; राज्यपाल C. P. Radhakrishnan यांची घोषणा

49
मुंबई प्रतिनिधी

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात आदर्श आदिवासी गाव विकसित केले जाणार असून, नाशिक येथे स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ (Independent Tribal University) उभारले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी केली आहे. हे विद्यापीठ IIT दर्जाचे अभियांत्रिकी महाविद्यालय व AIIMSच्या धर्तीवर वैद्यकीय महाविद्यालयासह उभारले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. (C. P. Radhakrishnan)

सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) येथे वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र प्रांताच्यावतीने नवनियुक्त आदिवासी खासदार व आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी आदिवासी प्रश्नांवर राजकारणापलीकडे जाऊन विचार होण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावले पाहिजे. त्यासाठी लोकनियुक्त प्रतिनिधींनी ठोस प्रयत्न केले पाहिजेत.”

आदर्श आदिवासी गाव
राज्यात विकसित होणाऱ्या आदर्श आदिवासी गावात (ideal tribal village) निवासी संकुल, शाळा, आरोग्य केंद्र, समाजमंदिर, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी सुविधा असतील. या गावांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नाशिक येथे स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ उभारले जाईल. या विद्यापीठातील ८० टक्के जागा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. त्याचबरोबर IIT दर्जाचे अभियांत्रिकी महाविद्यालय व AIIMS दर्जाचे वैद्यकीय महाविद्यालयही येथे उभारले जाईल.

(हेही वाचा – Delhi Assembly Election : ७० जागांवर ६९९ उमेदवार नशीब आजमावणार)

विशेष उपक्रम आणि पुढील योजना
राज्यपालांनी आदिवासी विकासासाठी राजभवनात आदिवासी कक्ष पुनरुज्जीवित केला असल्याचे सांगितले. ते लवकरच आदिवासी गावांना भेट देतील व अति आदिम समाजाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करतील. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याची मागणी केली. तसेच वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा – वैवाहिक वादांमध्ये महिलांच्या क्रूरतेचा परिणाम पुरुषांवरही होतो; Karnataka High Court चे निरीक्षण)

कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narahari Jirwal), वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष सत्येंद्र सिंह, ऑलिम्पिक स्पर्धेतील धावपटू कविता राऊत तुंगार यांच्यासह राज्यातील १७ आदिवासी आमदार उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते या आमदारांचा सत्कार करण्यात आला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.