- प्रतिनिधी
कुर्ला येथील काजूपाडा रस्त्यावर १० कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामावर भेगा पडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्याच्या खराब स्थितीमुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. (CC Road)
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेच्या प्रशासनाकडे याबाबत तक्रार नोंदवली असून, संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांना पाठविलेल्या पत्रात गलगली यांनी नमूद केले की, कुर्ला एल वॉर्डातील काजूपाडा रस्त्यावर अल्पावधीतच भेगा पडणे हे कामाच्या निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट करते. (CC Road)
(हेही वाचा – Delhi Assembly Election : ७० जागांवर ६९९ उमेदवार नशीब आजमावणार)
गलगली यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या प्रकरणी जबाबदार कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले जावे आणि भविष्यात अशा प्रकारचे प्रकरण टाळण्यासाठी कठोर पावले उचलावीत. तसेच, रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीबरोबरच अशा समस्यांचा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योग्य देखभालीसाठी ठोस योजना तयार करावी. (CC Road)
काजूपाडा रस्त्याच्या कामासाठी मोठा खर्च झाल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. या प्रकरणी पालिकेच्या दुर्लक्षावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासन या तक्रारीवर कशी कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community