- प्रतिनिधी
दरडप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या धोरणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील (Makarand Jadhav Patil) यांनी संबंधित अधिकारी व क्षेत्रीय स्तरावरून अभिप्राय मागवण्याची सूचना दिली आहे. या धोरणाबाबत शासनाने आक्टोबर २०२२ मध्ये एक ठराव तयार केला होता.
दरडप्रवण गावांचे पुनर्वसन यावर मकरंद जाधव पाटील (Makarand Jadhav Patil) यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आपत्ती व्यवस्थापनचे संचालक सतीशकुमार खडके, सह सचिव संजय इंगळे, अवर सचिव प्रितमकुमार जावळे आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ होणार का?)
धोरणात अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, जमीन भेगाळणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे यामुळे बाधित झालेल्या आणि आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करण्यासाठी निश्चित केलेल्या निकषांचा समावेश आहे. तसेच पुनर्वसनासाठी आवश्यक नागरी सुविधा पुरविणे आणि १२ प्रमुख सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद या धोरणात करण्यात आली आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील (Makarand Jadhav Patil) यांनी सांगितले की, “या धोरणाची अंमलबजावणी करतांना स्थानिक स्तरावर काही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे या धोरणात आणखी सुधारणा करण्याचा विचार केला जात आहे. तज्ज्ञ आणि संबंधित विभागांच्या सल्ल्यानुसार ही सुधारणा केली जाऊ शकते. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरून अभिप्राय घेणे आवश्यक आहे.”
(हेही वाचा – Larsen And Toubro : 90 तास काम करा सांगणाऱ्या कंपनीला सरकारकडून 70 हजार कोटींचा झटका)
धोरणातील सुधारणा आणि तंत्रज्ञानाच्या वापराने अधिक कार्यक्षम पुनर्वसन प्रक्रियेची रूपरेषा तयार केली जाईल. यामुळे भविष्यात दरडप्रवण गावांसाठी अधिक सुलभ आणि सुरक्षित पुनर्वसन प्रक्रिया सुनिश्चित होईल. या धोरणाच्या अंमलबजावणीवर आणि त्यातील सुधारणा व अतिरिक्त बाबींवर आगामी काळात निर्णय घेतले जातील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community