- प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक गती मिळावी म्हणून राज्यस्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात येणार असून, जिल्ह्यातील ताज प्रकल्प आणि इतर पर्यटन प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने घेण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिले आहेत.
मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या संदर्भात आयोजित बैठकीत देसाई बोलत होते. या बैठकीला माजी शिक्षणमंत्री व आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील व इतर विभागीय अधिकारी उपस्थित होते.
पर्यटनमंत्री देसाई (Shambhuraj Desai) यांनी बैठकीत सांगितले की, सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा असून, या जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी विविध महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. पर्यटनाच्या प्रलंबित योजना आणि सवलतींच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून पर्यटन विकासाला गती मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – पोलीस पाटील हे पोलीस अधिकारी नाहीत; हा सक्षम पुरावा म्हणता येत नाही; Supreme Court चे निरीक्षण)
पर्यावरणस्नेही प्रकल्पांवर भर
ताज प्रकल्पासाठी पर्यावरणाशी सुसंगत राहून आवश्यक त्या परवानग्या घेण्याचे आदेश देण्यात आले असून, स्थानिक नागरिकांचा विश्वास संपादन करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, “चांदा ते बांदा” या योजनेअंतर्गत मंजूर कामांसाठी वर्ग करण्यात आलेल्या निधीची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. (Shambhuraj Desai)
(हेही वाचा – एस.टी. भाडेवाढीबाबत Ajit Pawar यांनी मांडली भूमिका; म्हणाले…)
महत्त्वाच्या पर्यटन प्रकल्पांना गती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “सिंधुरत्न योजना”, सुरू होणारी सबमरीन सेवा, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पाटबंधारे प्रकल्पात प्रस्तावित वॉटर स्पोर्ट्स यासारख्या प्रकल्पांना लवकरात लवकर गती देण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी पर्यटन विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रित करावे आणि जिल्ह्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पर्यटन प्रकल्पांचे वेगवान आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. (Shambhuraj Desai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community