दावोस दौऱ्यात महाराष्ट्रासाठी १६ लाख कोटींची गुंतवणूक; CM Devendra Fadnavis यांची माहिती

मॅग्नेटिक महाराष्ट्र पुन्हा सुरू करणार, नवीन पिढी एआय करण्यावर भर देणार

76
मुंबई प्रतिनिधी 

राज्यात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक होत असून, महाराष्ट्राचे MoU (समजुतीचे करार) प्रत्यक्षात येण्याचे प्रमाण ६५ टक्के इतके आहे. येत्या तीन ते चार वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था (Economy of Maharashtra) १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य आहे. महाराष्ट्र देशाचे स्टार्टअप कॅपिटल झाले असून, तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राची ताकद आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis on Davos visit) हे सध्या दावोस दौऱ्यावर असून, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) सहभागी झाले आहेत. यावेळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या प्रगतीबाबत माहिती दिली. (CM Devendra Fadnavis)

दावोस दौऱ्यात १६ लाख कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, दावोस येथील बैठकीत आतापर्यंत १६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. गडचिरोली जिल्हा, जो पूर्वी नक्षलवादासाठी ओळखला जात असे, तो आता “स्टील सिटी ऑफ इंडिया” (Steel City of India) म्हणून नावारूपाला आला आहे. लॉयडस आणि जेएसडब्ल्यू यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी येथे मोठ्या गुंतवणुकीसाठी करार केले आहेत.

मॅग्नेटिक महाराष्ट्र समिट पुन्हा सुरू

कोविडमुळे खंडित झालेली “मॅग्नेटिक महाराष्ट्र समिट” पुन्हा सुरू करण्यात येणार असून, गुंतवणूकदारांना महाराष्ट्राची ताकद दाखविण्याचा संकल्प आहे. फडणवीस म्हणाले, “जागतिक पातळीवर एमओयू प्रत्यक्षात येण्याचे प्रमाण ३५ टक्के आहे, तर महाराष्ट्रात हेच प्रमाण ६५ टक्के आहे.” या एमओयूची अंमलबजावणी अधिक गतीने व्हावी यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली असून ती प्रकल्पांचे मॉनिटरिंग करणार आहे.

(हेही वाचा – राज्यात आदर्श आदिवासी गाव, स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ उभारणार; राज्यपाल C. P. Radhakrishnan यांची घोषणा)

१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था लक्ष्य

महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे केंद्र बनविण्यासाठी “१ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी एडव्हायजरी कमिटी” स्थापन करण्यात आली आहे. हा टप्पा २०२८ ते २०३० दरम्यान गाठण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रातील भौगोलिक आणि विभागवार जागांचा उपयोग गुंतवणुकीसाठी केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘एआय’ पिढी तयार करण्याचा संकल्प

तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर भर देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “तंत्रज्ञान हा घोडा आहे आणि आपण त्यावर स्वार झाले पाहिजे.” राज्यात एआय (Artificial Intelligence) तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित करण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात येत आहे. मुंबईजवळ १०० एकर जागेत “फ्यूचर रेडी इनोव्हेशन सिटी” उभारण्यात येणार असून ती पूर्णतः एआयद्वारे समर्पित असेल. राज्यातील ५०० आयटीआयमध्ये (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) एआय तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे. “नवीन पिढीला एआय-रेडी बनवून, राज्याला तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर बनविण्याचा आमचा मानस आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.

स्टार्टअप आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र देशाचे स्टार्टअप कॅपिटल आहे. “आज एक तरुण स्टार्टअप सुरू करतो आणि तीन वर्षांत युनिकॉर्न बनवतो. या स्वप्नाला महाराष्ट्रात प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही अनुकूल वातावरण तयार करणार आहोत.”

(हेही वाचा – राज्यात आदर्श आदिवासी गाव, स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ उभारणार; राज्यपाल C. P. Radhakrishnan यांची घोषणा)

स्थिर सरकार आणि स्पष्ट धोरणे गुंतवणुकीला पूरक

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासाचा उल्लेख केला. “स्थिर सरकार आणि स्पष्ट धोरणे यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत,” असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे हे आर्थिक प्रगतीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, जागतिक गुंतवणूकदारांच्या सहभागामुळे महाराष्ट्राचा विकास अधिक गतीने होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.