Mumbai Bank च्या सहकार संकुलासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करणार; राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा

48
मुंबई प्रतिनिधी

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Mumbai District Central Cooperative Bank) स्वयंपुनर्विकास योजनेला गती मिळावी आणि सहकार क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी सरकारकडून ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा सहकार राज्यमंत्री पंकज भोयर (Minister of State Pankaj Bhoyer) यांनी केली. मुंबई बँकेच्या स्वयंपुनर्विकास योजनेमुळे (Self-Redevelopment Scheme) केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात सहकार क्षेत्रात नवा आदर्श निर्माण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Mumbai Bank)

१६०० सहकारी गृहनिर्माण संस्थांचा सहभाग, ४ प्रकल्प पूर्ण
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आतापर्यंत १६०० सहकारी गृहनिर्माण संस्थांनी स्वयंपुनर्विकासासाठी संपर्क साधला आहे. या योजनेतून बँकेने २१८ कोटी रुपये वितरित केले असून, त्यातील चार प्रकल्प पूर्ण झाले आहेत. या प्रकल्पांतील सदस्यांना घराचा ताबा देखील देण्यात आला आहे. या योजनेमुळे अनेक सामान्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे.

(हेही वाचा – ठाण्यात Hit and Run; अज्ञात वाहनाच्या धडकेत पत्रकार आशिष आगाशेंच्या मातोश्रींचा मृत्यू)

सहकार क्षेत्रासाठी नवीन सहकार संकुल उभारणी

मुंबई बँक सायन प्रतिक्षानगर येथे सहकार क्षेत्रासाठी सर्व सुविधायुक्त सहकार संकुल उभारण्याच्या तयारीत आहे. हे संकुल सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र म्हणून उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पाला अनुदान देण्याची विनंती मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी केली.

राज्य सहकारी बँकेकडून १५०० कोटींच्या निधीचे आश्वासन

बैठकीत राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी राज्य सहकारी बँकेकडून १५०० कोटी रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले. तसेच, सहकारी बँकांनी कन्सोर्शियम तयार करून या योजनेला गती द्यावी, असेही त्यांनी सुचवले.

(हेही वाचा – नवीन जिल्हे निर्मितीचा कुठलाही प्रस्ताव सरकारकडे नाही; BJP च्या ‘या’ मंत्र्याने केला खुलासा)

प्रवीण दरेकर यांच्या स्वयंपुनर्विकास योजनेचे कौतुक
सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्या स्वयंपुनर्विकास योजनेचे कौतुक करताना सांगितले की, “साडेतीनशे चौरस फुटांची घरे ९०० ते १४०० स्क्वेअर फुटांमध्ये रूपांतरित झाली आहेत, ही बाब खरोखर कौतुकास्पद आहे.” या योजनेने आतापर्यंत अनेक गृहनिर्माण संस्थांचे पुनर्विकास प्रकल्प यशस्वी केले असून, राज्य सरकार देखील या योजनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

एक हजार प्रकल्पांचे उद्दिष्ट
भोयर यांनी बँकेला किमान एक हजार प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले. “जर ही योजना गतीने राबवली गेली तर प्रवीण दरेकर यांच्या प्रेरणेतून तयार झालेली योजना केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात चर्चेचा विषय बनेल,” असे ते म्हणाले.

(हेही वाचा – वेळ आली तर स्वबळावर लढेन; मेळाव्यातून Uddhav Thackeray यांचा मित्रपक्षांना इशारा)

सहकार संकुलासाठी ५० कोटींची तरतूद
सहकार राज्यमंत्री भोयर यांनी सहकार संकुलासाठी सरकारकडून ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या प्रकल्पामुळे सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणावर सहाय्य होईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

उपस्थित मान्यवर आणि पुढील दिशा
बैठकीला राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय मंडळ, मुंबई बँकेचे संचालक (Bank), म्हाडाचे अधिकारी, वित्त विभागाचे सहसचिव आणि स्वयंपुनर्विकास पूर्ण केलेल्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी स्वयंपुनर्विकास योजनेतील अडचणींवर चर्चा झाली आणि पुढील दिशादर्शन करण्यात आले. मुंबई बँकेची ही योजना सहकार क्षेत्रासाठी नवा आदर्श निर्माण करत असून, घरांच्या पुनर्विकासाची नवीन दिशा ठरली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.