Election Commission : खोट्या बातम्यांमुळे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होतोय ; विविध देशांतील निवडणूक आयुक्तांचे मत

51
Election Commission : खोट्या बातम्यांमुळे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होतोय ; विविध देशांतील निवडणूक आयुक्तांचे मत
Election Commission : खोट्या बातम्यांमुळे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होतोय ; विविध देशांतील निवडणूक आयुक्तांचे मत

निवडणुकीच्या काळात परस्परांवर आरोप करताना मांडल्या जाणाऱ्या बनावट आणि वादग्रस्त बातम्यांबाबत चिंता व्यक्त करून यापासून सावध राहण्याचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी गुरुवारी (23 जाने.) दिला. यामुळे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होतो, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आपल्या भाषणात एआयप्रणीत प्रक्रिया, ऑनलाइन आणि दुरस्त मतदानासह सध्या प्रचलित प्रक्रिया अधोरेखित केल्या. (Election Commission)

हेही वाचा-Domestic Air Traffic : देशांतर्गत हवाई वाहतुकीत 6 टक्क्यांची वाढ

निवडणूक आयोगाच्या वतीने अशा निवडणुकीचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते. उझबेकिस्तान (Uzbekistan), श्रीलंका (Srilanka), मॉरिशस (Mauritius), इंडोनेशिया (Indonesia) आणि कझाकिस्तान (Kazakhstan) या देशांतून संमेलनात सहभागी विविध प्रतिनिधींनीही आपल्या देशात पार पडलेल्या निवडणुकीतील अनुभव मांडले. (Election Commission)

हेही वाचा-धार्मिक स्थळांवरील Loudspeaker वर कारवाई करण्यासंबंधी Bombay High Court ने केले दिशादर्शन; आधी समज द्या, नंतर…

मॉरिशसचे मुख्य निवडणूक आयुक्त अब्दुल रहमान यांनी अशा खोट्या बातम्यांच्या समस्येवर बोट ठेवताना हा मतदारांच्या विश्वासाला तडा देणारा प्रकार असल्याचे सांगितले. इंडोनेशियाचे निवडणूक आयुक्त इधन होलिक यांनी आपल्या देशात आयोग कसा समर्पित सोशल मीडिया ग्रुपचा वापर करीत आहे, याची माहिती दिली. यामुळे बाहेर काहीही चर्चा असली तरी या माध्यमातून सत्य तेच लोकांना कळेल, असे ते म्हणाले. (Election Commission)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.