बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’; Eknath Shinde यांची उबाठावर टीका

78
बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’; Eknath Shinde यांची उबाठावर टीका
बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’; Eknath Shinde यांची उबाठावर टीका

निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतपणे शिवसेनेला (शिंदे गट) दिल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाने शिवसेनेने मोठा जल्लोष केला. या विजयानंतर आयोजित शिवसेनेच्या ‘शिवोत्सव’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ झाली आहे. त्यांना सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही,” अशा शब्दांत शिंदे यांनी टीका केली. (Eknath Shinde)

(हेही वाचा- Domestic Air Traffic : देशांतर्गत हवाई वाहतुकीत 6 टक्क्यांची वाढ)

शिंदे म्हणाले, “केवळ ‘तुम लढो, हम कपडे संभालते है’ म्हणत पक्ष चालत नाही, त्यासाठी शिवसैनिकांची मने जिंकावी लागतात. विधानसभेतील जनतेने आम्हाला खऱ्या शिवसेनेची मान्यता दिली असून, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची प्राणपणाने जोपासना केली आहे.” (Eknath Shinde)

शिवोत्सव कार्यक्रम आणि नेत्यांचा सन्मान

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त बीकेसी मैदानावर आयोजित शिवोत्सव कार्यक्रमात शिवसेनेचे प्रमुख नेते, आमदार, खासदार, व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शिवसेनेच्या नव्या मंत्र्यांचा व आमदारांचा सत्कार करण्यात आला. (Eknath Shinde)

(हेही वाचा- मशिदीबाहेर Congress नेत्याने केली जय इस्लाम अशी घोषणाबाजी; मुस्लिम मतांसाठी लांगुलचालनाचा आरोप)

शिवसेनेचा विजय आणि पुढील दिशा

शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांच्या प्रेरणेने शिवसैनिक घडले आहेत. त्यांच्या विचारांच्या जोडीने काम केल्यानेच विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने मोठा विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला ठाकरे गटाच्या तुलनेत २ लाख अधिक मतं मिळाली, तर विधानसभा निवडणुकीत १५ लाख अधिक मतं मिळाली. ठाकरे गटाने ९७ जागा लढवून फक्त २० जागा जिंकल्या, तर आम्ही ८५ पैकी ६० जागांवर विजय मिळवला.” (Eknath Shinde)

स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे आव्हान

शिंदे यांनी शिवसैनिकांना ग्रामपंचायत ते महापालिकांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले. “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या मोहिमेच्या माध्यमातून शिवसेना घराघरात पोहोचवा आणि बाळासाहेबांची विचारधारा प्रत्येकाच्या मनात रुजवा,” असे त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)

(हेही वाचा- धार्मिक स्थळांवरील Loudspeaker वर कारवाई करण्यासंबंधी Bombay High Court ने केले दिशादर्शन; आधी समज द्या, नंतर…)

शिंदे यांचा ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हटले, “ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, ते स्मारक कसे बांधणार? स्मारकाच्या प्रवेशद्वारावर नतमस्तक होऊन माफी मागायला हवे होते, परंतु खुर्चीच्या मोहात त्यांनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले.” (Eknath Shinde)

शिवसेना कार्यकर्त्यांसाठी विशेष मार्गदर्शन

शिवसैनिकांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, “आपल्या पाठिशी गॉडफादर नाही, शिवसेना हीच आपली गॉडफादर आहे. सामान्य शिवसैनिकच आपल्याला मोठं करतो. त्यांच्या संघर्षात त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि अडचणींच्या काळात मदत करा.” (Eknath Shinde)

(हेही वाचा- दरडप्रवण गावांच्या पुनर्वसन धोरणात सुधारणा करण्यासाठी अभिप्राय मागवावेत; Makarand Jadhav Patil यांची सूचना )

‘लाडक्या बहिणी’कडून शिंदेंचा सत्कार

मुख्यमंत्री पदाच्या काळात यशस्वीपणे राबवलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेच्या यशाबद्दल महिलांनी शिंदेंचा सत्कार केला. फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्काराच्या माध्यमातून महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. (Eknath Shinde)

शिंदे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सांगितले की, “आता जबाबदारी वाढली आहे. राज्याच्या विकासासाठी आपण शेवटपर्यंत काम करत राहू आणि शिवसेनेचा भगवा सातत्याने फडकवत ठेवू.” (Eknath Shinde)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.