उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अंधेरी येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात अनेक आमदार आणि खासदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या मेळाव्याला माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील उपस्थित होते. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा- दरडप्रवण गावांच्या पुनर्वसन धोरणात सुधारणा करण्यासाठी अभिप्राय मागवावेत; Makarand Jadhav Patil यांची सूचना )
याशिवाय, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर ,बंडू जाधव हे खासदार तर आमदार दिलीप सोपल, बाबाजी काळे, आणि राहुल पाटील यांसारख्या नेत्यांचीही अनुपस्थिती जाणवली. ठाकरे गटासाठी या नेत्यांचा पाठिंबा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या गैरहजेरीने पक्षातील अंतर्गत मतभेद उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Uddhav Thackeray)
या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आगामी निवडणुकीतील रणनीतीवर भर दिला. गद्दारीच्या आरोपांचा समाचार घेत, त्यांनी शिवसैनिकांना एकजूट ठेवण्याचे आवाहन केले. मात्र, प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीने या मेळाव्याची चर्चा इतर कारणांवर केंद्रित झाली. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा- Domestic Air Traffic : देशांतर्गत हवाई वाहतुकीत 6 टक्क्यांची वाढ)
गैरहजेरीमागील कारणांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आगामी निवडणुकांतील तिकीट वाटपावरून नाराजी किंवा व्यक्तिगत कारणे यामागे असू शकतात. (Uddhav Thackeray)
या घडामोडींमुळे ठाकरे गटाच्या आगामी निवडणुकीसाठीची तयारी आणि गटाच्या अंतर्गत एकजुटीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नेत्यांमधील संवाद आणि पक्ष नेतृत्वाने घेतलेले निर्णय यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. (Uddhav Thackeray)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community