मराठी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि आलोकनाथ (Alok Nath) यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्याविरुद्ध गुंतवणुकीचं आवाहन करत कंपनीची जाहीरात केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या कंपनीच्या कार्यक्रमात सोनू सूद (Sonu Sood) देखील प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.
हेही वाचा-‘दारू पिऊन वाहन चालवू नका’चा फलक घेऊन सिग्नलवर उभा राहा ; Bombay High Court तरूणाला शिक्षा
हे प्रकरण इंदूरमध्ये (Indore) नोंदणीकृत असलेल्या सोसायटीतील 50 लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेलेल्या कंपनीच्या प्रमोशनशी संबंधित आहे. हा एफआयआर हरियाणातील सोनीपतमध्ये (Haryana Sonipat) नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, या कंपनीनं 6 वर्षांपूर्वी लोकांकडून पैसे वसूल केले. कंपनीत फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा इतर मार्गांनी गुंतवणूक केल्यास लोकांना मोठ्या परताव्याचं आश्वासन देण्यात आलं. एवढंच नाही तर, लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी महागड्या आणि मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित केले गेले आणि प्रोत्साहनांच्या नावाखाली बहु-स्तरीय मार्केटिंगच्या धर्तीवर एजंट तयार केले गेले. या प्रकरणात 25 जानेवारीला कोर्टात सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये सोसायटीच्या अधिकाऱ्यांना जबाब द्यावा लागणार आहे. (Shreyas Talpade)
सुरुवातीला कंपनीनं काही लोकांना पैसे दिले, पण जेव्हा कोट्यवधी रुपये जमा झाले, तेव्हा प्रकरण वेगळ्याच वळणावर गेलं, असं सांगितलं जात आहे. आता कंपनी पैसे देण्यास कानकूस करत होती आणि जेव्हा लोकांनी पैसे मागू लागले, तेव्हा कंपनीचे अधिकारी त्यांचे मोबाईल बंद करू लागले. कंपनीनं 2023 मध्ये, त्यांच्या एजंट आणि गुंतवणूकदारांशी असलेले सर्व संबंध तोडले. जेव्हा लोक कार्यालयात गेले आणि गोंधळ घालू लागले, तेव्हा त्यांना तिथेही कुलूप लावलं. (Shreyas Talpade)
हेही वाचा-Domestic Air Traffic : देशांतर्गत हवाई वाहतुकीत 6 टक्क्यांची वाढ
सर्व अधिकारी आणि कर्मचारी लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेले. एजंट्सद्वारे चालवली जाणारी 250 हून अधिक सुविधा केंद्र होती आणि वरिष्ठ अधिकारी फक्त ऑनलाईन पद्धतीनं काम करत होते. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तळपदे आणि आलोकनाथ यांच्याव्यतिरिक्त एकूण 11 जणांची नावं आहेत. या मार्केटिंगमध्ये जर एखाद्या एजंटनं जास्त लोकांना जोडलं तर, त्याला बक्षिस म्हणून ट्रॉफी दिली जायची. या कंपनीला प्रमोट करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिची श्रेयस तळपदेलाही हायर करण्यात आलं होतं. (Shreyas Talpade)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community