नव्या वर्षात एसटीचा (ST) प्रवास (Bus Ticket) महागला आहे. एकीकडे टॅक्सी (taxi) आणि रिक्षा (rickshaw) चालक संघटनांकडून प्रवास भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. परिणामी आजपासून (24 जाने.) एसटीची भाडेवाढ लागू झाली असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिली आहे. (Bus Ticket)
हेही वाचा-Mahakumbh 2025 : श्रीकृष्णजन्मभूमीसाठी संघर्ष करा; महाकुंभमध्ये संत-महंतांचे आवाहन
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक काल मंत्रालयात पार पडली. त्या बैठकीत एसटीसह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ दरवर्षी होणे अपेक्षित असते. मात्र मागील ३ ते ४ वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती. त्यामुळे आता एकत्रित १४.९७ टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली असून ती आजपासून लागू होईल. तसंच रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही ३ रुपयांची वाढ करण्यात आली असून तो निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.” (Bus Ticket)
हेही वाचा-‘दारू पिऊन वाहन चालवू नका’चा फलक घेऊन सिग्नलवर उभा राहा ; Bombay High Court तरूणाला शिक्षा
एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे आता लालपरीचा प्रवास महागणार आहे. एसटी बसेससोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनांच्या दरात ३ रुपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. दरम्यान, भाडेवाढीमुळे रिक्षाचे किमान भाडे २३ रुपयांहून २६ रुपये इतका होणार असून टॅक्सीचे किमान भाडे २८ रुपयांहून ३१ रुपये इतके होणार आहे. (Bus Ticket)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community